inbound6894285190970346483.jpg

#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा
#कथालेखन
#संसार_रथ

💚 संसार रथ 💚

तिशी उलटूनही खुशी अविवाहित होती. कलागुणांनी पुरेपूर होती. काळीसावळी पण नाकिडोळी व्यवस्थित. शिक्षणही जेमतेमच.

ती शिवभक्त असल्याने पहिल्या श्रावण सोमवारपासून एकवीस सोमवारचे व्रत केले.
व्रत फळास आले. समाप्तीपूर्वीच तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सुस्वरूप आणि उच्च विद्याविभूषित, मोठ्या पगाराची नोकरी असलेला आनंद तिच्या आयुष्यात आला. त्याने तिचे रूप नाही तर गुण बघितले.

लग्नानंतर वर्षाच्या आतच त्याचा मोठा अपघात झाला. डोक्याची शस्त्रक्रिया झाली. नोकरी गेली. त्याचे मानसिक संतुलन बिघडले.
खुशी ने त्याला हिंमत दिली. स्वतः शिवणकाम करून संसार रथ चालवला.

आता मात्र त्याने खुशीचा शिवणकामाचा व्यवसाय वाढवून महाराष्ट्रभर पसरवला.
आज लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवशी सारेजण त्यांना शंकर पार्वतीची जोडी म्हणत शुभेच्छा देत होते.

शब्दसंख्या : १००

®️©️ मनिषा चंद्रिकापुरे
@ माझ्यातली मी

10 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!