शतशब्द कथा

#माझ्यातली मी..
#शतशब्द कथा लेखन
#दि -२७/७/२०२५
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
🌹नियतीवर मात 🌹
राजचा अपघात … आणि अवनीच्या पायाखालची जमीनच सरकली. हसते-खेळते घर कोसळताना दिसले. कणखर राज एका पायाने अपंग झाला. त्याच्या डोळ्यात अंधारी निराशा दाटली, रागात अपंगत्वावरचा संताप आणि नियतीवरची चीड होती. “मी आता कुचकामी झालो!”
तो म्हणाला की अवनीच्या काळजात चर्र होई. तिने रात्रंदिवस एक केले, पण अपंग पायाकडे पाहिले की तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत. तरीही, दुसऱ्या दिवशी ती त्याच हसऱ्या चेहऱ्याने उभी राही, “तुम्ही माझ्यासाठी जग आहात, राज. आपण पुन्हा उभे राहू…”
तिने व्हीलचेअर आणली, गाडीतून राजला ऑफिसला सोडले. तिच्या निर्णयाने राजला पुन्हा जगण्याची, लढण्याची अस्फुट आशा दिसली.
तिच्या शब्दांतून, त्यागातून, डोळ्यांतील निरागस प्रेमातून ती खऱ्या अर्थाने त्याची पार्वती बनली, त्याच्या आयुष्याला पुन्हा बहर आणणारी संजीवनी!
शब्द संख्या १०६ ~अलका शिंदे

14 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!