अर्धा वाटा

# माझ्यातलीमी # विकेंड टास्क#कथालेखन

विषय#मनभावन श्रावण

‌‌कथेचे शीर्षक- * अर्धा वाटा *
——————————
* श्रावण महिना आला की सगळं वातावरण कसं उल्हासित होऊन जातं. सारी सृष्टी हिरवाकंच शालु नेसलेली भासते .आणि मनामनात मनभावन श्रावणातल्या रिमझिम बरसणाऱ्या सरी पाहून आनंदाच्या उर्मी उसळू लागतात .श्रावण महिना हा राखी मंगळागौर सारख्या भावभिन्या सणांनी नटलेला असतो . तन्वीच्या लग्नाला पाच वर्ष होऊन गेली होती . मंगळागौरीचे उद्यापन करण्यासाठी ती माहेरी आली होती .यावेळेस अनायसे राखीला ती माहेरी असल्यामुळे भावा बहिणीच्या प्रेमाचा सण राखीला आशुतोष दादाला राखी बांधताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रूतरळत होते शेवटी परक्याचं धन तनवी आपल्या घरी निघून गेली.
नानासाहेबांना दोनच आपत्ये. मोठा आशुतोष आणि धाकटी तन्वी. सांपत्तीक स्थिती ही उत्तम होती .यावेळी नानासाहेबांनी कधीकाळी वीस-पंचवीस वर्षांपूर्वी घेतलेल्या शेअर्सना चांगला भाव मिळाला .शेअर्सची रक्कम हाती आली. तेव्हा पत्नी विणाताई आणि नानासाहेब दोघांनी ही ठरवले की हा ‘लक्ष्मीचा प्रसाद’ आहे .तेव्हा काही रक्कम तन्वीला ही द्यावी .आशुतोष तिथेच होता. तो म्हणाला ” बाबा घाई काय आहे .तुमच्या नंतर मी तनवी ला तिचा वाटा देईल ना. आता घाई कशाला ” नानासाहेब म्हणाले “अरे तसं नाही .आता आमचंही वय झालंय .आपल्यासमोर ज्याचा त्याला वाटा दिला की आम्ही सुटलो .” विणाताई म्हणाल्या “अरे तिलाही तिचा वाटा वेळच्यावेळी दिला की तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हालाही पाहता येईल .”
आशुतोष चिडला .आई तू तिची बाजू घेऊ नकोस आणि हा पैसा बाबांचा आहे आणि त्यावर वारसदार म्हणून माझाच हक्क आहे .”विणा म्हणाली अरे हक्काच्या काय गोष्टी करतोस ?तुला माहित आहे ना आता मुला-मुलीत भेद उरला नाही. आई-वडिलांच्या इस्टेटीत मुलींचाही बरोबरीचा वाटा असतो. ” “ठीक आहे मग तन्वी ला म्हणावं त्यासाठी आपल्या आई-वडिलांचं करायला वर्षातले अर्धे दिवस इथे येऊन राहा.” विणाताईना खूप वाईट वाटलं.” अरे काहीतरीच काय ?नानासाहेब यावर काहीच बोलले नाही. त्यांनी विणाताईंना समजावलं “जाऊ दे ग.तसं ही तन्वीला आपण भरपूर दिलं आहे .” हे ऐकून विणाताईना नानासाहेबांचाही राग आला .
.शेवटी तेही पुरुषंच ना?
आई-वडिलांच्या इस्टेटीत मुलामुलींच्या बरोबरीचा वाटा यावरून घरात खूप तमाशे झाले, चिडाचिड झाली. बहिणी म्हणजे भावांसाठी वैरिणी झाल्या . वाटेकरी झाल्या. ह्या सगळ्या प्रकरणात विणाताई चिडून तन्वीकडे निघून गेल्या. वर्षभरात कोणी कोणाची विचारपूस केली नाही . असे कितीक श्रावण निघून गेले. पण ते श्रावण मनाला भावणारे आनंददायी नव्हते .तन्वी आणि विणाताईंच्या डोळ्यातून वेदनाच्या श्रावण सरी बरसत होत्या. दादासाहेब अंथरुणाला खिळले. पण त्यांचा ही इगो कायम होता. कारण विणाताई त्यांच्यावर चिडून आपण होऊन निघून गेल्या होत्या.
नाना साहेबानीही एकदाही विणाताईंना फोन केला नाही. ते गेले कळल्यावर मुलगा तरी घ्यायला येईल असं वाटलं होतं पण नाही . तोही आई बद्दल मनात राग धरून होता ‌ मन हे काचेसारखं असतं एकदा तुटलं की पुन्हा जुळत नसतं. आई गेली तरी मुलगा आला नाही .केवढी शोकांतिका हे सारे पैशाचे खेळ. पैसा असला तरी कठीण ,नसला तरी कठीण. त्यात माणसाचा इगो हा तर सर्वात मोठा शत्रू . ताटा तुटीच्या बाबतीत याचा सर्वात मोठा वाटा. आई वडील दोघे गेले . आशुतोषचं लग्न झालं नव्हतं.या क्षणी तरी सगळी इस्टेट आशुतोष चीच होती. हळूहळू झाल्या गोष्टींचा त्याला पश्चात्ता होऊ लागला ..वयोपरत्वे त्याच्या जीवनात एकाकी पण आलं. एवढ्या इस्टेटीचं काय करू ?आईचा प्रेमळ चेहरा आठवू लागला .लहानपणी एकमेकांच्या हातात हात घालून बागडणारी, एकमेकांच्या दुःखात होरपळणारी आणि आनंदाने हुरळून जाणारी तन्वी त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागली, लोभ आणि मोहाचा असर असा काही त्याच्यावर चढला होता की त्याने प्रेमाचे सारे धागे तटातट तोडून टाकले होते. एका सुखी कुटुंबाची राख रांगोळी झाली होती आशुतोष पश्चातापात जळत होता. पण अजून एक मायेचा तुटका धागा शाबूत होता आणि तो त्यांनी पुन्हा जोडण्याचा निश्चय केला .
तोच श्रावण महिना रिमझिम रिमझिम श्रावणाच्या सरी बरसत होत्या. अचानक दारावर टकटक ऐकून तन्वीने दार उघडलं .आणि तिच्यासमोर चिंब भिजलेला, काया कृष्ण झालेला, तिचा भाऊ आशुतोष उभा होता . क्षणभर सारा भूतकाळ विसरून दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या अश्रूत झालं गेलं सारं विसरून जाऊया म्हणून विनन्ति होती.
आज श्रावणातला तोच भावा बहिणीच्या प्रेमाचा दिवस राखी पौर्णिमा होती. इतक्या वर्षातल्या राख्या तन्वीनी सांभाळून ठेवल्या होत्या. त्या भावाच्या हातावर बांधल्या आणि आशुतोषने तिला तिच्या हक्काचा अर्धा वाटा
दिला. हा श्रावण मात्र खरोखर मनभावन श्रावण होता बाहेर श्रावण सरी बरसत होत्या आणि दोघांच्या डोळ्यातून अश्रू सरी ओघळत होत्या.
****
लेखिका-मनीषा लिमये

..

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!