#माझ्यातलीमी
#विकएंड_टास्क
#कथा_लेखन(२५/७/२५)
#मन_भावन_श्रावण
#श्रावण_मासी_हर्ष_मानसी_हिरवळ_दाटे_चोहिकडे _
अवनी किती छान कविता,आजी ही कविता तुला आवडली!
ही कविता आहे. अग तो कुठल्या तरी मराठी महिना चालू झालायं ना त्याच ते काय तरी आत्म कथा…न का काय ते लिहून आणायला सांगितले आहे. मी युट्यूबवर सर्च केलं तर ही कविता मला भेटली,मग मी नोट बुक मध्ये बघितलं तर श्रावण हा शब्द पहिल्यांदा च आहे मग मी आजुन काही मिळतंय का म्हणून पाहात होते, तर तू म्हणालीस किती छान कविता! चल तुच लिहून दे मला ;आई पण म्हणत होती की तु टिचर होतीस .
हो गं बाळ मी शिक्षिका होते,ही कविता बालकवींची आहे
ही कविता तू बोलत होती, मला तर ही कविता ऐकून माझ्या डोळ्यासमोर पटकन श्रावण महिनाच उभा राहिला.किती ही वेळा वाचली तरी ही कविता म्हणजे आंनद साजरा करणारा महिना ,सण साजरा करणारा महिना, व्रतवैकल्य आणि गोडधोड पदार्थ बनवण्याची रेलचेल आणि खाण्याची त्याहून मजा.चल दे मी लिहून देते तुला #मन_भावन_श्रावण.कस आहे ना अवनी जेव्हा आपण आत्मकथन लिहीत असतो ना तेव्हा असं आपण तो महिना किंवा ती व्यक्ती, वस्तू आहोत असेच वाटले पाहिजे.तरच आपण तो विषय खूप छान दुसऱ्यांना समजावून सांगू शकतो किंवा समोर उभा करु शकतो.
आजी हे घे ,”पेन,वही आणि खोडरबर अगं रबराची गरज नाही लागणार; मी लिहून देते तुला छान श्रावण महिन्याचे आत्मकथन,मग तर झालं.पण आज जरी मी लिहून दिले तरी उद्या तुझे तू मुद्देसूद लिहायला शिकली पाहिजेस,आलं का लक्षात.
मी श्रावण वर्षातील तो महिना याचं नाव ऐकताच हृदयात छान सुखद गारवा आणि उत्साह संचारतो. माझ्या आगमनाची चाहूल लागताच. निसर्ग जणू नव्या चैतन्याने नटतो मी येतो तेव्हा आकाश ढगांनी भरून जातं, आणि पृथ्वीला माझ्या पावसाच्या सरींनी भिजवून टाकतो. माझे अस्तित्व म्हणजे प्रेम उत्सव आणि नवनिर्मिती ह्याचे एक वेगळेच मिश्रण आहे. माझ्या जन्माची कहाणी प्राचीन आहे. भारतीय संस्कृतीत मला विशेष स्थान आहे.
माझ्या येण्याने शेतकरी आनंदाने नाचतात कारण मी त्यांच्या शेतांना जीवदान देतो. माझ्या पावसाच्या थेंबाने धरती तृप्त होते आणि पीक हिरवीगार होतात पण मी फक्त शेतकऱ्यांचा नाही तर प्रत्येकाच्या मनाचा मित्र आहे . माझ्या येण्याने कवी कवयित्रींना कविता सुचतात प्रेमी एकमेकांच्या जवळ येतात आणि लहान मुलं माझ्या सरीमध्ये नाचतात माझ्या प्रत्येक दिवसात एक नवीन कहाणी आहे कधी मी रिमझिम पावसाने संवेदन येतो तर कधी मी मुसळधार पावसाने सर्व भिजून टाकतो माझ्या या विविध गुणांमुळे काही माझी भीती वाटते तर
काही ना मी हवाहवासा वाटतो.
माझ्या येण्याने नद्यांना खळखळ करत वाहतात तर झाडांना नवीन पालवी येते आणि माणसाच्या मनात एक आशा निर्माण होते आनंददायी उत्साह नवचैतन्य जणू जागवत म्हणूनच तर बालकवींची कविता श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे माझ्यावर समग्र वर्णन जाणू.
मी आलो म्हणजे उत्सवांचा रंगही वेगळा असतो माझ्या त सुरुवातीलाच नागपंचमी रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टमी यासारखे सण मीच साजरी करायला मदत करतो मला पण माणसा आपल्या प्रयोजनांना भेटायला येतात आणि माझ्या पावसात भिजतात एकमेकांशी गप्पा मारतात माझ्या प्रत्येक थेंबात एक कहानी एक भावना दडलेली असते
माझ्या येण्याने सासुरवाशीण माहेरवाशीण सुखावतात कारण माहिती मस्त हातावर मेहंदी झाडांवर झुले टांगले जातात नागोबाला दूध लाह्या व्हायला जातात. रक्षाबंधन म्हणजे नुसता धागा बांधून नाही तर भावा बहिणीचं गोड नातं जपणं हे माझ्याच महिन्यात होतं ना. बहीण घरी येणार म्हणून भाऊ जेवढा अतुर असतो तेवढीच आई-वडील पण आतुर असतात मुलीच्या भेटीला काय करू काय नको असं होऊन जात सगळ्या घराला. माझ्या येण्याने तर माणसं तर आनंदी होतातच पण पशुपक्षी पण आनंदी होतात कुठे मेरा मोराचा केक आहे का येतो तर कधी कोकिळा पंचम सुरात गाताना ऐकायला येते चिमणी पाखर पण खूप किलबिलॅट करतात. कृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा सोहळा साजरा केला जातो तो दही पोळ्या पोह्यांचा काला त्या कृष्णाच्या बाललीला परत एकदा मी साजऱ्या करतो.
पण मी जसा आनंददायी आहे ना म्हणजे सर्वत्र हिरवळीची चादर पसरवतो, धरणीला सुंदर नट नटवतो, पण काही वेळेला माझ्या पावसाचा जोर पण खूप वाढतो कारण उत्साहात इतका असतो त्यामुळे काही ठिकाणी उठतो आणि माणसं दुःखी होऊन जातात तेव्हा मला खूप वाईट वाटतं पण मी निसर्गाचाच एक भाग आहे ना आणि माझं काम आहे पृथ्वीला सुपीक करणं असं मी म्हणतो आणि पुन्हा माझ सौम्य रूप घेतो.
मी येतो तेव्हा ऊन पावसाचा लपंडाव पण सुरू होतो कधी एका ठिकाणी मी खूप बरं असतो पाऊस रूपाने तर कधी मी नुसता झिमझिमच पडतो मी तुम्हाला सांभ्रमात टाकतो छत्री न्यावी की नको न्यावी म्हणजे नेली तर ओझ नाही नेली तर अडचण अशी काहीतरी विचित्र परिस्थिती करतो. पण खरं सांगू या महिन्यात म्हणजे मी जेव्हा असतो तेव्हा प्रेव्ह्यू केला ना प्रेमी यूगला ना जणू पर्वणीच मिळते. कॉलेजमधले तरुण-तरुणी मस्त पिरेड बंद करून कुठेतरी डोंगरावर फिरायला जातात खूप जण भाजलेल्या मक्याचा कणसाचा आस्वाद घेतात वाफाळलेला चहा डोंगर उताऱ्यावर पडलेले इंद्रधनुष्याच्या कामानी खाली फोटो काढतात यात माझ्या महिन्यातच कुठे कुठे वर्षा सहलीचं आयोजन केलं जातं. कवी कवियत्रींच्या
मैफिली सजतात.
आता मला तुमचा निरोप घेण्याची वेळ येते व मी माझा सर्व पसारा आवरता घेतो आणि तुम्हाला गणपती बाप्पाची चाहूल लावून भाद्रपद महिन्याला खो देतो. म्हणजे जेव्हा माझे निरोप घेण्याची वेळ येते तेव्हा मी हळूच मागे सरकतो माझ्यापाठोपाठ भाद्रपद येतो आणि माझ्या पावसाच्या आठवणी सोडून जातो पण मला माहिती आहे पुढच्या वर्षी पुन्हा मी येणार आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या मनात गारवा आणि आनंद देणार आहे.
बघा असं आहे होय मी #मन_भावन_श्रावण.
#२६_०७_२०२५_शनिवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

**mitolyn**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.