#माझ्यातली मी
#शत शब्द कथा
#डायरी (२१/०७/२०२५)
हर्षिता घरातील सगळ्या जबाबदाऱ्या हौसेने पार पाडायची पण कुणी तिचे एका शब्दाने कौतुक करत नव्हते. हळूहळू तिचा उत्साह मावळला. वयाच्या पन्नाशीला तिने आत्महत्या केली. सुसाइड नोट नसल्यामुळे खुनाचा संशय नवरा व सासरच्यांवर गेला. पोलिसांच्या तपासात तिची डायरी मिळाली. त्या डायरीमध्ये तिच्या इच्छा, अपेक्षा कशा अपूर्ण राहिल्या आणि वर्षागणिक कशी तिची जगण्याची जिद्द संपली ते लिहिलेले होते. त्या डायरीवरून पोलिसांना आत्महत्येची खात्री पटली. तिने प्रत्यक्ष आरोप न केल्याने तिच्या सासरचे निर्दोष सुटले.
पण ….. त्या डायरीतील प्रत्येक प्रसंगात तिच्या मनाची झालेली घुसमट वाचून तिच्या सासरच्यांना जाणवले की अप्रत्यक्षपणे तेच तिच्या ह्या टोकाच्या निर्णयाला कारणीभूत होते. ह्याचा पश्चात्ताप त्यांना स्वस्थपणे जगू देणार नव्हता.
©®राधिका गोडबोले
