नयना आणि आदर्श एकमेकांवर नितांत प्रेम करायचे. दोघांनी विवाह बंधनात अडकून एकमेकांना जन्मोजन्मी साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या.
पण एक दिवस अघटीत झाले नयना एका भीषण अपघातात गंभीर जखमी झाली. दोन्ही कुटुंबांवर जणू आभाळच कोसळले. जवळजवळ आठ दिवस ती जणू मृत्यूशी झुंज देत होती. जीव वाचला पण तिच्या चेहऱ्याचा काही भाग विद्रूप झाला.
या अपघातानंतर आदर्शला त्याच्या नातेवाईक व मित्रांनी त्याचे नाते तोडण्याचा सल्ला दिला.”अशा कुरुप चेहऱ्याच्या मुली बरोबर कसं आयुष्य काढशील”? पण आदर्शने त्यांना एकच सडेतोड उत्तर दिले. आम्ही दोघांनी मनापासून एकमेकांवर प्रेम केले आहे. हा अपघात माझ्याबरोबर ही होऊ शकला असता. आणि हो बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर असते.
