#माझ्यातलीमी #शतशब्दकथा

#सौदर्याची नजर
रितेश आणि राधिका यांना दोन मुले होती-मुलगी शोभना आणि मुलगा रितेश.दोन्ही मुलांचा जन्म परदेशात झाला होता. आता राधिका आणि रमेश यांचे परदेशातील वास्तव्य संपले होते, म्हणून ते मुलांसह गावी परत आले. पण मुलांना परदेशातील राहणीमानाची सवय झाली होती. गावातील चिखल, माती, गाई-गुरे पाहून त्यांना राहायचे नव्हते. एक दिवस रमेशने मुलांना गावातील उंच टेकडीवर संध्याकाळी नेले. तिथून संपूर्ण गाव, सूर्यास्त नदीत पडणारी सूर्यकिरण आणि आकाशात उडणारी बगळ्यांची रांग दिसत होती. हे सौंदर्य पाहून शोभना आणि रितेश हरवून गेले शोभनाला चित्रकला आणि रितेशला कविता लिहिण्याची प्रेरणा मिळाली. रमेशने मुलांना जवळ घेऊन म्हटले, “बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते!”.
#१००शब्द
#सोमवार १४/०७/२०२५
©️®️ # सौ.अपर्णा जयेश कवडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!