……….. निरागस उत्सुकता………..
दोन शेतकरी मित्र रामदास आणि विश्वनाथ शेतीतील कामे बघायला गेली असतांना परतीच्या वाटेत रामदासचा साप चावून मृत्यू झाला. रामदासला एक मुलगा. त्यावेळेस तो एक वर्षाचाच होता. घरात आई,आजी व तो. विश्वनाथच्या घरात ते दोघे,आजी-आजोबा व दोन मुले.
थोडे समजायला लागल्यावर त्याने आजीला विचारले आजी, आबा आणि बाबा कुठे आहेत? तिने सांगितले ते देवाघरी गेले.
त्याच्या मनात पाल चुकचुकली. तसा तो केवळ आठ वर्षाचाच. डोक्यावर विचारांच्या टिचक्या मारत त्याने स्वतःलाच समजविले की काकांच्या घरात खाणाऱ्यांची तोंडे जास्ती म्हणून’ घरच्या धन्याला उदंड आयुष्य दे ‘अशी लोकं म्हणत असतील.
त्याच्या नजरेतील प्रामाणिकपणाला त्याच्याच या प्रश्नाला त्यानेच नकळत सुंदर उत्तर दिले.
…….. अंजली आमलेकर………. १४/७/२५
