#माझ्यातलीमी
#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा (१४/७/२५)
#सुप्रभात
#प्रामाणिक_नजर
💜 प्रामाणिक नजर 💜
शाळेची सहल आज एका खेडेगावात आलेली. शाळेचे प्रयोजन होते सहलीच्या निमित्ताने मुलांना गावातील राहणीमान कळावं, प्रदूषण विरहित भागात वेळ घालवता यावा.
गावातून फेरफटका मारताना त्यांनी बघितलं काही मुलं कचऱ्यातून काहीतरी जमा करत आहेत. हे दृश्य बघताच मुली ओरडल्या, “इइइइई.. शी, किती घाणेरडे आहेत ते ..!”
मात्र अंजली म्हणाली, ” बरोबर बघा, ते प्लास्टिक जमा करत आहेत, जे रिसायकलिंग साठी पाठवतील.”
“अगदी बरोबर अंजली.” वर्गशिक्षिका म्हणाल्या, “तुला प्रत्येक दिसणारी गोष्ट सुंदर च दिसते कारण तुझी नजर प्रामाणिक आहे. मुलींनो, कचऱ्यातील प्लास्टिकचे सजीव सृष्टीवर आणि एकूणच वातावरणावर फार गंभीर परिणाम होतात. प्लास्टिकचा वापरच करू नये आणि केला तर त्याची योग्य विल्हेवाट लावावी.”
©️®️ मनिषा चंद्रिकापुरे (१४/७/२५)
#शब्दसंख्या – १००
#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा

