मी आर जे

# माझ्यातले मी #
***** रेडिओ शो *****
***** मी आर जे लेखन टास्क *****
…….. मी घेतलेली मुलाखत……
शुभ दुपार
नमस्कार मंडळी..
कसे आहात आपण?मजेतच असाल ना!
मी आर जे अंजली आणि तुम्ही ऐकत आहात ९०. २ एफ एम रेडिओ. मंडळी दुपारचे तीन वाजले आहेत.शांततेचे वातावरण आहे. कधी ऊन पडलेले दिसत आहे तर कधी पावसाच्या सरी पडतांना दिसत आहे. मध्येच थोडी थंड बोचरी हवा अंगाला भिडून गेल्यासारखे वाटत आहे. कारण येतोय ना आता श्रावण महिना.
मंडळी,
झालीयना दुपारची झोप. दुपारची झोप जास्ती बरी नव्हे हं. हो ना!

आजच्या या भेटीगाठी कार्यक्रमात जे पाहुणे आलेले आहेत त्यांचे तर आपण स्वागत करणार आहोतच पण आपण श्रोते म्हणून तुमचे सुद्धा या कार्यक्रमात स्वागत आहे. आजचा हा कार्यक्रम आपण शांतपणे ऐकून घ्याल अशी आशा करते.
आपला आजचा कार्यक्रम हा वैद्यकीय मान्यवरांवर आधारलेला असतो. नेहमीप्रमाणेच तुम्ही सर्वजण मंगळवारी प्रसारित होणारा ‘वैद्यकीय क्षेत्र ‘याविषयी चर्चा अर्थात मुलाखत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असता. आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर संध्याताई.
आर जे…… या या संध्या ताईआपले आजच्या कार्यक्रमास स्वागतच आहे. डॉक्टर गालातल्या गालात हसतात. खरं सांगायचं तर डॉक्टर संध्या ताई ही माझी मैत्रीणच आहे.
……….. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी……..
डॉक्टर……. कशी आहे अंजली?
आर जे….. मी उत्तमच असणार.तुझ्यासारखी मैत्रीण मला लाभली हेच माझे भाग्य.
डॉक्टर…… चल तर मग या आजच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांमध्ये तुझी माझी भेट झाली.
आर जे…… हो अगं, पण मी तुला एकच फोन केला तर तू कोणतेही आढेवेढे न घेता यायला तयार झालीस.
डॉक्टर….. बर आता आभार वगैरे म्हणू नकोस बरं.
आर जे…… तुझे क्लिनिक जोरदार सुरू आहे असे समजले. रेडिओवर मी तुझे कार्यक्रम ऐकले आहेतच.तू आयुर्वेदाचार्य असून वेगवेगळ्या विषयावर पण तू बोलतेस हे तुझ्या रेडिओवर झालेल्या कार्यक्रमामुळे मला कळले.
डॉक्टर……. हो अगं माझे सतत कार्यक्रम सुरू असतात.शाळेचे सुद्धा बोलावणे येते.
आर जे….. क्लिनिक मधून तेवढा वेळ मिळतो का तुला ?
डॉक्टर…….. हो अगं, काढावाच लागतो. समाजात वापरायचं असेल तर सगळ्या गोष्टी धरून चालाव्या लागतात.
आर जे……. हो खरं आहे तुझं
….. आता मी थोडं मैत्रीचं नातं बाजूला ठेवून एक प्रख्यात वक्त्या म्हणून मी अग तूग वरून अहो जाहो वर येते.
संध्या ताईंचे आपण आदराने अभिवादन करून स्वागत करूया व कोणताही वेळ न दवडता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया.
डॉक्टर…… धन्यवाद
आर जे….. मी प्रथम डॉक्टर संध्या ताईंचा तुम्हाला परिचय करून देते. प्रख्यात आयुर्वेदाचार्य डॉ.संध्या ताई या या आयुर्वेदाच्या जाणकार असून त्यांना त्याचे सखोल ज्ञान आहे. आपल्यासाठी त्यांचे मार्गदर्शन आणि उपचार आपल्या आरोग्य व निरोगी जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे.
………………. ऍड……………….
घुटनो का दर्द, जोडो का दर्द
आर्थोप्लस अमृत नोनी
चला आता जास्त वेळ न घालविता आपण मुलाखतीला सुरुवात करूया.
आर जे…… डॉ.तुम्ही आयुर्वेदाकडे कसे काय वळलात?
डॉक्टर……. माझे वडील हे वैद्यकीय डॉक्टर होते. त्यामुळे घरचे वातावरणही तसेSurgery ही ही मी तुम्हाला माझ्या बालपणी ऐकलेली गोष्ट सांगते……. माझ्या गुरुचा मुलगा त्याला औषधोपचार पद्धतीत मुळीच रस नव्हता. तेव्हा त्यांनी त्याला आवडेल तो व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पण एक अट घातली. त्याने त्यांचे मित्राचे गावी जाऊन त्यांना भेटावे मात्र जातांना चिंचेच्या झाडाखाली झोपण्यास सांगितले. मुलगा मित्राकडे गेला. या- बस आटोपल्यावर त्यांनी त्याला सहज विचारले की तू चिंचेच्या झाडाखाली झोपला होतास का?
मुलगा हो म्हणाला….. तेव्हा ते म्हणाले…. म्हणूनच तुझा चेहरा मलुल दिसतो. तू असं कर परतीच्या प्रवासात तू कडुलिंबाच्या झाडाखाली झोप. मुलाने तसे केले व घरी परतला. तेव्हा वडिलांनी विचारले,तू कडुलिंबाच्या झाडाखाली झोपला होतास का? मुलगा आश्चर्यचकित झाला. त्यालाही निसर्गाची आवड निर्माण झाली. माझेही तसेच झाले. निसर्गाची आवड मलाही निर्माण झाली. त्याची ख्याती ही ऐकलीच होती की व्यक्तीच्या शरीरातील आणि मनातील संतुलन साधण्यासाठी निसर्गपचाराचा किती जास्त फायदा होतो. त्यामुळे निसर्गासोबत राहण्याची आवड निर्माण झाली व या क्षेत्रात जाण्याचे ठरवले व गेली सुद्धा.
आर जे…… डॉ. (BAMS)… Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery ही पदवी संपादन करण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागतो?
डॉक्टर…… ही पदवी मिळविण्यासाठी आम्हाला साडेपाच वर्षाचा कालावधी लागतो. तो अभ्यासक्रमच मुळे साडेपाच वर्षाचा असतो.
आर जे……. या अभ्यासक्रमात कोणत्या विषयाचे प्रशिक्षण दिले जाते?
डॉक्टर……. यामध्ये आयुर्वेदिक, वैद्यकीय सिद्धांत आणि क्लिनिकल याचे प्रशिक्षण दिले जाते.
आर जे…… डॉ. आयुर्वेदामध्ये कोणकोणत्या वनस्पतींचा उपयोग होतो?
डॉक्टर……. तुळस कोरफड हळद आवळा मेथी जिरे ओवा अश्वगंधा अडुळसा गुळवेल शतावरी आणि अजून बरीच काही की ज्यांचा उपयोग या आयुर्वेदामध्ये केला जातो.
आर जे…… डॉ. ही औषधे तयार करण्याची प्रक्रिया काय असते?
डॉक्टर……. अशी कोणतीही वनस्पती नाही की ज्यापासून आयुर्वेदिक औषधे तयार होत नाही. ही औषधे तयार करतांना वनस्पतींची मुळे, साल,पाने, फळे,फुले, डहाळ्या व बिया यांचा सुद्धा वापर करतात. यावर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करून या सगळ्यांची पावडर करतात. त्यामध्ये तेल व मसाल्यांचा वापर करून त्याचे छोटे छोटे गोळे बनवितात. अशाप्रकारे ही औषधे तयार करतात. या औषधांमध्ये
जुनाट वेदना कमी करतो
जुनाट आजार बरा करतो
हाच त्यातील एक महत्त्वाचा गुण आहे.
…………… ऍड………..
ओ हो, दीपिकाजी आइये आइये
अच्छा खासा अपना सामान….
ये नही वो…..
निर्मा सुपर निली डिटर्जंट टिकिया
आप तो मेहंदी वाली……
निरमा निरमा वॉशिंग पावडर निरमा….
आर जे…… डॉ रुग्णांची तपासणी तुम्ही कोणत्या पद्धतीने करता?
डॉक्टर….. आम्ही नाडी परीक्षण करून रुग्णांची शारीरिक तपासणी करतो.
आर जे…….. डॉ. तुम्ही रुग्णावर कशा प्रकारचा उपचार करता?
डॉक्टर……. वनस्पती आधारित जी औषधे आहेत तिचा वापर करून आम्ही रुग्णांवर उपचार करतो.तसेच संतुलित आहार शरीराचे शुद्धीकरण ज्याला आपण पंचकर्म म्हणतो यासारखे उपचार करून आम्ही रुग्णांना बरे करतो.
आर जे…… डॉ. पंचकर्म म्हणजे काय?
डॉक्टर….. हि आयुर्वेदातील उपचार पद्धती आहे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून शरीराचे शुद्धीकरण केल्या जाते.
आर जे…. डॉ. तुम्ही रुग्णांना कोणता सल्ला देता?
डॉक्टर…….. आम्ही त्यांना निरोगी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतो व आजारांपासून दूर पळण्यासाठी काही उपाययोजना सांगतो.
आर जे……… डॉ.नैसर्गिक उपचार पद्धतीचा रुग्णांवर कोणत्या प्रकारे परिणाम होतो?
डॉक्टर….. आयुर्वेदिक उपचार केल्याने त्याचे शरीरावर कमी दुष्परिणाम होतात. फक्त या औषधावर पथ्य पाण्याची काळजी घेणे आवश्यक असते. गुण हा शंभर टक्के येतो पण मुंगीच्या पावलाने. रोगाचा पूर्ण नायनाट करूनच जातो.
……………… ऍड……………
सफेदिका नया रंग लाया
नया उजाला चार बूंद वाला
आर जे…….. डॉ.या औषधाचा परिणाम हा दीर्घकाळ चालणारा असतो का?
डॉक्टर…… काही ठराविक आजारावर हा उपचार दीर्घकाळ चालतो व त्याचा परिणामही चांगलाच दिसून येतो.
आर जे…… डॉ. तुम्ही शस्त्रक्रिया देखील करू शकता का?
डॉक्टर…….. हो आम्ही शस्त्रक्रिया करू शकतो पण त्यासाठी (CCIM) सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन कडून औपचारिक प्रशिक्षण घ्यावे लागते.
आर जे……. डॉ.तुम्ही आम्हाला आयुर्वेदावर खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे आभार.
डॉक्टर………. जाता जाता एकच सांगेन की….. आजकालचे जीवन हे धावपळीचे झालेले आहे त्यामुळे जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ राहून आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणून माझे एकच सांगणे आहे की सुंदर आणि निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपचारांचाच स्वीकार करा.
आर जे……… धन्यवाद संध्या ताई तुम्ही येथे उपस्थित राहून उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल मी आर जे व श्रोते आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. असेच वेळोवेळी येऊन आम्हाला मार्गदर्शनासाठी आपला हवाहवासा वाटणारा वेळ मिळेल ही सदिच्छा व्यक्त करून आजचा कार्यक्रम संपल्याचे जाहीर करते.
…………. चला मंडळी भेटूया………
……. पुढच्या मंगळवारी…… याच दिवशी याच वेळेत……
……. धन्यवाद…..
……. अंजली आमलेकर….. १२/७/२५

19 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!