देवाला नमन करून पहिल्या गुरूला नमस्कार.
नंतरचा गुरू
गुरू माझी आई
मम जन्माने माता पिता आनंदले
पहिलेच फुल वेगळे निघाले
परी तयांनी डोळ्यांना थांबविले
सगळे त्यांच्या आनंदात सहभागले
जिच्यामुळे मी आज जगात माझ्याच पायावरी चालले जड बूट जड मी उचलूनी तू दवाखाने पार केले
तव आयुष्य माझ्यासाठी वेचले,जग हसले,
कष्ट मनाची तोड नाही जगात कशाला खर्च केला जगाने पुसले.
माझ्यावरी खर्चीलेल्या,वेचलेल्या कष्टांची मी ऋणी आयुष्यभर
तव साथ आशीर्वाद,दिलेले संस्कार, वळण पुरेल मला आयुष्यभर
तुझ्याचमुळे मी सदा आनंदी दुसऱ्यास करावी मदत ही शिकवण
उपयोगि सदैव मला डोळ्यात आसवांना नाही थारा आयुष्यभर .
सगळ्याच आई असतात पण माझी आई जगावेगळी कळू दे साऱ्या जगाला
किती दुःख असोनी हास्य कधी ना गेले,अनंत कष्ट सोसोनी कळले ना जगाला
इतरांसाठी तत्पर समाधान हेच चांगले वळण मम आयूष्यला.
किती लिहू न, काय,लिहू सुचेना झाले मला
तव वर्णन कराया शब्द न पुरती मला
काय कमी राहिले समजून घे मला जगाला ही कळू दे जरा नेहमीच कष्टणाऱ्या तुला.
ज्योती काळे
