#दीर्घकथा #माझ्यातली मी!! 🩷🩵🩷शालिनी प्रवीण सुर्वे नाशिक🩷. “एक सुखद अनुभव अनुभूती”!!!🩷आजचा दिवस खुप सुंदर अन् आनंदी असा होता. कारण माझ्या आवडीचा अन् मन प्रसन्न करणारा होता. तशी तर खुप धावपळ सुरू होती अन् सकाळी सकाळी मात्र माझ्या जुन्या सखीचा फोन आला. तिचा फोन बघून मला खूप आनंद झाला. खुप दिवस झाले भेट नव्हती. तिने विचारलं आपण भेटू या ना?
खर तर मला जमणार नव्हतं. त्यामुळे मी नाही बोलले. तशी रागावून ती बोलली .
काय हे तुझ ?
तूझ्या आवडीच्या ठिकाणी भेटू या तसा तूझ्या साठी प्लॅन केला आहे अन् नाही म्हणून सांगते.जा मग.
अरे अरे रागावू नकोस ग राणी” पण प्लॅन काय होता ते तरी सांग.
सांग ना आता किती नोटँकी आता तुझी? त्यावर ती बोली तूझ्या सवे अन् हसलो दोघी!
अग चल माझ्या माहेरी जायचं आहे. तुला खुप आवडते ना? अन् मग,माझा आनंद गगनात मावेना… अहो कारण तसे होते तीच माहेर हे गावी होते अन् माहेरच घर शेतात. गेल्या वेळेस आम्ही दोघी नी खुप धमाल मस्ती केली होती. त्याला चार वर्ष झाले पण अजून ही आठवणीत ते सर्व होते. आता सांगा नाही म्हणून कस चालेल मला, लगेच सारी काम बाजूला सारून हो म्हंटले. चल जाऊया,सोड ती काम, सुखावलेले ते क्षण जरा लुटुया आनंद हा सोहळा जगायचं असतो ज्या क्षणी मिळाला की अन् तो ही भरभरून…
मैत्रिणीला लगेच हो म्हणून टाकले. ठरले उद्या सकाळीच निघायचे . त्या दिवशीची सकाळ मला जास्तच फ्रेश वाटली. नऊ वाजता दोघी निघालो माझी गाडी पुण्याला आहे. अन् तिच्या कडे
गाडीच नव्हती मग लाल परी ने निघालो खर तर त्यात बसून ही खुप दिवस झाले होते. बस स्टॉप ला गेलो तिच्या गावी जाण्यासाठी, दिवस भरात तीन वेळा गाडी जाते अन् ती ही तुडूंब भरलेल्या असतात. जस तस शिरलो आत तर जागाच नाही बसायल अरे देवा आता, आळशी मी उभ राहून मी दमणार आता, तस तर फक्त दोन तासाचा प्रवास होता. तरीही माझा चेहरा हिरमुसला… पण बाजूच्या सीटवर बसलेले जोडपे इतके गोड होते की स्वतःहून उठून मला जागा दिली. मग मी बसले. अन् ते उभे राहिले.ती व्यक्ती त्यांची बायको, छोट बेबी असे बसलो. सखी बिचारी उभी राहिली. ती बोलली तू बस मला चालते. “माझी लाडी, वाह लाल परी अंतरी” प्रवास त्यात बाजूचे ते बेबी येवढं गोड की ते माझ्या कडे बघून नुस्ते खुदकन हसत होते.ते बघून माझी सखी मला चिडवत म्हटली तु आवडली त्याला आई ग केव्हढ मोट्यांन हसलो की कलोळ झाला. आजू बाजू सर्व बघायला लागले.माझ्या पर्स मध्ये नेहमीच चॉकलेट्स असतात, मी लगेच त्याला दिले. अरे देवा केवढा आनंद अगदी चेहऱ्यावर दिसत होता.” खरच लहान मुले इतकी गोड अन् निरागस असतात, की त्याला गरीब श्रीमंत चे टॅग शोभतच नाही”. निखळ आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. देवा कडे मागावे तर फक्त फक्त बालपण परत दे, इतकं सुंदर. बोलता बोलता गाव आले.
बस मधून उतरताच मला त्या मायेचं अन् ओल्या मातीचा सुंगध अत्तर परी भारी अंतरी वाटू लागला. गाव कडची माणस किती अदबिनी छान चोकशी करतात, कशी काय घरची माणसं तब्बेत पाणी bla bla प्रश्न च प्रश्न… पोहचे पर्यंत वाह अजून हे सारे आहे सुख इथ. किती छान फक्त कोपरा झालंय बस येवढेच की, आले आले सरी चे घर वाह वाह क्या बात !
” हिरवे हिरवे गार गालिचे सारखं अन् त्यात ठुमदर अस तीच माहेर घर” खुप बदल ही झालेला दिसला अन् छान वाटले. बदल
माहेर घर” खुप बदल ही झालेला दिसला अन् छान वाटले. बदल हा हवा च की पूर्वी तिचे घर सुंदर असे कौलारू होते. पण आता पाऊस पासून सुरक्षित असावे या साठी असे छान विटा सिमेंटने बनवलेले होते. पण दिसायला तेवढेच ठूमदार होते. अन् त्याच्याच बाजूला कोपऱ्यात अजून एक घर होते अगदी छोटेसे खुप सुरेख असे ते घर होते. शेताची राखण मशागत करणारे सालादाराचे न राहून माझे पाऊल तिकडे वळली. तशी सरी ही पूढे होऊन घेऊन गेली. अन् त्या घरातून एक सुंदर अशी देखणी स्री जीच सौंदर्य मातीत लपलेलं दिसेल इतकं गोड… शब्द कमी पडतील तीच्या कौतुक साठी असे होते. खरतर अंगावर मळलेली लाल रंगाची साडी नेसलेली. भरगच्च हातात हिरव्या बांगड्या अन् कपाळी कुंकू डोळ्यात काजळ, सर्व कडे किती तरी गोंदलेलं, रुपड इतकं गोड की त्याला नजर लागते की काय. सौंदर्य काय असते खऱ्या अर्थाने वाह वाह मस्त रे शेताच्या मातीचा ग्लो आलेला असे वाटले. आम्ही आलो तशी लगबगिने बसण्या साठी चादर सरकावली. घर तीच छोट पण स्वच्छ होते. घर छोटे मोठे पेक्षा नीटनेटकी अन् स्वच्छ मला आवडते. नाही तर वाईट बोलत नाही पण मग पाणी घेणे नको वाटते. बाई अन् घर हे तीच्या स्री पणा ची ऊर्जा असते. त्याला आपण लक्ष्मी ही बोलतो. असे खर घर इतके सुंदर वरती छताला कौल अन् मध्येच फटीतून सूर्याचे किरण खाली जमीनवर येत होती. तशी मी लाजले कारण डोळ्यावर आलीली किरण मलाच खुलवत होती. सरी मध्येच बोलली, अग मग किती गोड पाऊना आलेला आहे मग ते बघायला गर्दी करताय तुला, ते किरण ग अगदी फटीतून तुला गुपचूप न्याहळतय बघ अन् मी खुदकन हसले काय हे तुझे सरी तर तर गोड माझी मैत्रीण आहे. मग स्वागत आहे हे शब्द रुपी बर पुरे तुझा कौतुक सोहळा तीच घर तस शेणानं सारवलेल होते. त्याच सुंगध येत होता. मायेनं बसा म्हटली. इतकं थंड वाटत होते. मी आपसुक चादर बाजूला सारून जमिनीवर च बसले. तर
ती बिचारी ताई ताई खाली नका बसू.. अरे त्यात काय ग,एवढं इतकं सुंदर नेटनेटके स्वच्छ घर तुझे अन् गार किती असुदे चालत बघ बर मला .सांग नाव काय तुमचे म्हटली मला अहो जावो नका बोलू मी काम करते नोकर मानस आम्ही साधी शी बाई मी आपण मालक लाजावू नका मला, अरे देवा किती ही समजारी बर, मग मी ही म्हंटले अग त्यात काय एवढे तु ही जीव आहे अन् मी ही गरीब श्रीमंत टॅग कशाला अन् सन्मान द्यावा की प्रत्येक नात्यात ला मानूसिकीचा किती तर लागेलच बोली ताई तुम्ही छान बोलता तुम्ही एकात बसावं वाटत तशी सरी म्हटली त्यासाठी घेऊन आले.मग मी मध्येच बोलाली. बर ते जाऊदे, तुझे नाव सांग, तस पटकन बोलीली “कुसुम” वाह वाह मस्त रे किती गोड नाव तुझे अगदी साजेस नाव आहे. तीच कुसुम तशी मला म्हंटली ताई चहा टाकते. साखरे चा घेणार की गुळाचा .. अरे वाह क्या बात गुळाचा चहा चालेल .बर छान फकड बनवते अन् लगबगीनं चुली जवळ गेली.
चहा म्हटल की पाच मिनिट मग्ये तयार होतो गॅस मुळे.. आधुनिक तंत्रज्ञान मुळे सारे सोपे झाले आहे. जीवन आपले पण ही बिचारी चूल पेटवणार. मला ही वाईट वाटले पण ती काही ऐकेना माझा सारे लक्ष तिच्या कडे होते. पटकन बागंड्या वर करत चुली जवळ गेली, किती सुंदर चूल मांडली तिची डिजाइन चक्क गॅस सारखी होती मातीची पण जॉईन केलेली. मला कौतुक वाटले पटकन जेवण बनवता येते. पाऊण येतात मग घाई होते अस ती सांगत होती.
हो तर खर आहे तीच एक स्री असते तिला हे सर्व समजत गोड रे बाबा छान तीन दोन लाकड त्यावर गोवरी चे तुकडे थोडूस रॉकेल ओतून अलगत चूल पेटवली. मग चहा उकळवत हळून मधेच चुलीला लोकंडाच्या छोट्याश्या नळी न फुंकर ही मारत होती वाह
चुलीला लोकंडाच्या छोट्याश्या नळी न फुंकर ही मारत होती वाह वाह मस्त रे अगदी माझ्या आजीची आठवण करून दिली. झालं चहा तयार एक कपात अन् सोबत बशीत घेऊन आली. आम्ही तिला एकच कप सांगितला होता मग दोघी मैत्रिणी वाटून घेणार होतो. कप बशी अर्धा अर्धा भाग चहा केला. तस कुसुम मला बोलली ताई तुम्ही बशीत घ्या अन् एक भुरका मारून प्या खुप मज्जा येईल. छान वाटले एकायला आता भुरका कस मारू येईना मग प्रयत्न करीत वाफाळलेला चहा तोंडाजवळ नेत गरम वाफ फुंकर घालून भुरका मारला. आवाज तर नाय आला तोंड धुवून घेतले चहा न अरे अरे किती हसलो. पण मज्जा आली किती हे सुख अनुभवले, आनंद कसा घेता येईल असं मग म्हटली सरी चल उठ आईबाबा वाट पहात आहे. आलो अन् तस ईकड आलो अरे हो हो निघणार तस कुसुम न आवाज दिलं ताई थांबा कुंकू लावते. किती ही गोड संस्कृती परंपरा ही भावली मनाला अन् म्हणते कशी येवढ्या गोड पावण्या आमच्या घरी आले भाग्य माझा गरीब कड कोण येते. मी तिला ओरडाच दिला अरे कुसुम वेडी आहेस अस का बोलतेस तु किती सन्मान बोलवले अरे एवढ प्रेमानं आज काल कुणी नाही करत उलट मला खूप आनंद वाटला कुंकू लावत नमस्कार करू पाहत होते. तस मी तिला अडवले नको कुसुम वाकू नकोस मी तिला प्रेमानं थांबल अन् न राहून हातात तिच्या पाचशे नोट ठेवली. छान साडी घे माझ्या कडून गिफ्ट तशी ती चकित झाली म्हटली अहो ताई एवढी मोठी नोट कमवायला आम्हाला किती वेळ काम करावं लागतं नको नको तुमचे प्रेम च खुप झाले मग डटावाटच घे चूप तस तिच्या चेहऱ्यावर वर आनंद किती होता.
जस लॉटरी लागली खरच किंमत असते त्याचे मोल महत्व असते योग्य ठिकाणी नाय तर आपण खरचं करताना विचार करत नाही. चला चला आई बाबा कडे अन् पुढे सरसावलो
वाह क्या बात रे सरी चे घर अंगण स्वच्छ सुंदर किती बदल
झालेला दिसला. अन् छान च की सरी चे बाबा त्या लाकडी खुर्ची वर बसलेले होते अन् आई बाजूला भाऊ शेतावर काम करत होता अन् वहिनी चुली जवळ स्वंयपाक सुंगध तर बरीच सुटलेला आम्ही येणार म्हणून छान बेत केलेला मी पुढे सरसावून आईबाबा चा नमस्कार केला.
ही एक अत्यंत सुंदर संस्कृती परंपरा आहे. आपली जी मला तर भावते,, बाबा पांढऱ्या सुब्र धोतर अन् सदरा, आई नऊवारी गोड दिसत होते दोघं अगदी भरभरुन आशीर्वाद दिलं छान चोकशी केली अन् आनंद आमचे स्वागत खर तर अजून काय पाहिजे. माहेर वाशनीला काही क्षण सुखावकेले बस येवढेच थोडे बोललो चहा झालंय कुसुम कडे नको आता जेवायला येतो तो वर फेरफटका मारतो शेतात अन् लागलीच लहान मुलं सारखं उड्या मारत बाहेर शेतात धिंगाणा करायला दोघी बाहेर पडलो शेतात पाऊल ठांकताच माझे डोळे दिपले खूप दिवसांनी शांत हिरवगार रानं पाहिले माझ्या साठी स्वर्ग हा शेतात ठपूर ज्यारी ची कणस डोलत होती बाजूला माझ्या नजरेत तून पाण्या चां धबधबा च की अरे पूर्वी ही विहीर होतो आता विहिरीला छान कंपाऊंड करून झाकून बाजून ग्रीन कलर चा पाहीप काढून मोठ स कुंड पाण्याचं बाजूला त्या पहिपातून त्यात पाणी येत अन् पुढे छोटी माझ्या नजरेतून नदी पण त्याला काय म्हणता मला माहीत नाही मग मी त्याला छोटी नदी ची उपमा दिली असे त्यात पाणी येत अन् मग शेतात अस किती छान बर व्हाव पुढे गेलो तर तिकड शेताचा बांध बाजूला कॉर्नर ल एक छत अन् वर एक कप्पा तिथं गोफण पण होती जी मला खूप आवडते तिथं कधी कधी सालधर वरती कंदील घेऊन झोपतो शेताचे राखण करायला मस्त च की, मला तर एक भानाट कल्पना सुचते की त्यावर झोपताना मोकळे आकाश स्वच्छ चांदण्यांनी भरलेले माती चा सुंगध अन् गार अंगावर
झोमनारा वारा अगदी शहारा यावा असा काळाकुठ अंधार असला तरी भीती न वाटावी मधंच सार्ज्या राज्याच्या अलगत नाजूक गुंगराचा आवाज कानी एकु यावा कुठं तरी दूर वर हलखेसा प्रकाश जनवावा काजव्याच वाह वाह क्या बात रे मी तर हरवले रे या कल्पनेत मांडायला इतकी गोड मग अनुभव सुखवून गेला.
पुढे कडे कडे न आंब्याची झाड होती अन् घराच्या अंगणात मागे फुल झाड किती तरी प्रकारची बहरलेली तुळस मोगरा पारिजात गुलाब झेंडू शेवंती निशिगंध वाह वाह किती सुंदर तस आधी नवत पण आता सरी च्या शेताला कंपाऊंड वॉल केलेली होती प्राणी शेजार शेजारी शेतात वाद नको काळीजी छान च की सर्व कस मर्यादेत अन् आपल्याच ताब्यात एक सुखद सुखद अनुभव रे हा सोहळा आयोजित मी माझ्या मनी आवडीचा अन् सुखवला मग मी च माझ्या विश्वात मग्न तृप्त होऊन अस,,,सरी अन् मी अगदी लहान मुल सारखं इकडून तिकडून उड्या मारत होता पाण्या ची फवारी अन् तो शेतात वाहणारा झरा न राहून आम्ही बघण्याच्या नादात मस्ती करताना चक्क पडलो की पाणी माती याची सांगड घेऊन रंगपंचमी साजरी केली एवढा प्रचंड आनंद भान वीसरलो आईबाबा ते बघून हसले अन् मनी सुखवले बघून आमचा आनंद माहेर वाशनी,,गाणं गाऊ का शब्द माझे त्यात टाकून खेळताना रंग बाई मातीच ग मातीच, सुटला तोल माझा आनंद डोहीचा डोहीचा,, सोडला ग मी डाव माझ्या वयाचा!! ७ खळखळून हसायला येत होते सरी मी गुंगलो त्यात, तसा आवाज आला वहिनी बाईंचा चाल पटकन पुरे आता मस्ती जेवण तयार आहे या बर दोघी हो हो वहिनी आलोच की जरा थांबणं! पुढे तसेच सरसावलो समोर बोराची एक झाड काटे जरी असली तरी अगदी गोड आंबट बोर सालदाराने झाड झटकत पाडून दिली लगबगीनं वेचत ठाक मिटक्या मारीत खाली हा हा म्हणता म्हणता किती हे
वेचत ठाक मिटक्या मारीत खाली हा हा म्हणता म्हणता किती हे सुख अनुभवले ओंजळ तुडूंब भरली माझी तर आनंदाची परत ओरडा आला तसा दोघी पळालो घरात जरा चेंज करत पुढ्यात येऊन उभे राहिलो तसे बाबा हसत म्हणाले बाई झाले समाधान तु. आली की सरी ही जगते पूर्वी येते तेव्हा नाही होत अस खरच लक्ष्मी आहेच पोरी अशीच नेहमी हसत राहा बघून जीव आमचा सुखवतो येत जा घर आमचं गोकुळ परी बोलायला लागते वाह किती छान आमच्या साठी शब्द मी तर नाहून निघाली,,, मग तस वहिनी नी पान मांडली मस्त गरम गरम रसा आमटी पटवडी आईच्या हातचे इंद्रायणी तांदुळाच्या वास गरम गोल गरगरीत भाकरी कांदा लोणचं ठेसा पितळ चे ताट थांब्या लोटी
काय थाट आमचा या पेक्षा मोठा पाऊंचार कुठलाच नाही सर्व फिक पडावं अस माझ्या नजरेत बाकी येवढं प्रेम आग्रह ममता वसल्या आईबाबा न च किती वर्णन करू शब्द कमी पडतील प्रत्येक दिवस भरायचा अनुभव माझ्या हृदयात अन् डोळयात भरून भेटून साचला तृप्ती न डोळे पाणावले माझे,, खर किती गोष्टी सुटतात निसटत आयुष्यातून पण काही क्षण विश्रांती अशी मैत्री मिळाली तर जपावी जगावी अस मला वाटत संध्याकाळी निरोप घेतला अन् निघणार तस आईन वहिनी भाऊ ही आलेला प्रेमानं गोड खाऊ दिला बर्फी बनून साडी चोळी अन् हातात पैसे दिले दोघींना ही सारखच अगदी आपले पण हे सारं बघून डोळयात पाणी अलगत शरीरा स्पर्श करत पुर व्हावा अन् अभिषेक वाव्हा अस होत होत पेसे किती साडी चोळी कशी भाव तोल नाही त्यात फक्त ममत्व जपून तिजोरीत ठेवावी इतकी लाखमोलाची, आनंदी जीव झालं असा त्या दिवशी कंटाळा केला असता तर किती सुंदर अन् श्रीमंत सुखाला पारखी झाली असती मी सारे काम टाकून गेलो ठेवाच औंजळ भरून घेऊन आलो सुख समाधान एक एक सुखद अनुभव आपल्या पुढे सादर केला अगदी सहज सुचलं म्हणुन लिहिलं नक्की च भाळेल आपल्याही मनाला
अन् भुरळ पडेल त्या जगण्याचं किती तरी गोष्टी मांडायच्या राहिल्या जेवढ्या आठवणीत राहिल्या त्या आपल्या सव् आठवणी.क्षण !! शालिनी सुर्वे!!
