#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा(३०/६/२०२५)
#स्वप्नीलकळ्या🥀
#चित्रावरून विषय:—-‘दुर्लक्ष करण्याचे कौशल्य वाढविणे’ म्हणजे “सुख”
@everyone
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
शीर्षक::– “मला कसंतरी होतयं!”
रमाचे वय जवळपास सत्तरीच्या आसपास आणि शेजारी समवयस्क मैत्रिण उमा.
रमाला मधुमेहासारखा मोठा आजार
असूनही बाऊ न करता औषध , पथ्यपाणी,आहार नियंत्रण व नियमित व्यायाम . सकारात्मकता व तक्रारीचा सूर नसल्याने आजार नियंत्रणात.
अगदी याउलट उमा. छोट्या गोष्टीचा खूप बाऊ करण्याची संवय सगळ्यांनाच त्रासदायक. दरवेळी डॉ .कडे गेली की मला काय आजार झालायं?
असंख्य प्रश्न व शंकाकुशंका! डॉ.ही वैतागलेले .
छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता सतत अस्वस्थ ,दु:खी व धास्तावलेल्या चेहऱ्याने वावर.
उलट रमा सतत आनंदी व हसरी खेळकर.
कल्पिताचे भय वास्तवापेक्षा अनंत पटीनं जास्त असते. “मला कसंतरीच होतंय”हे वाक्यच उमाला सतत दु:खी बनवायचं तर “मला कुठे काय झालयं?,मी ओके आहे” हे म्हणणारी रमा दुर्लक्ष करण्याचे कौशल्य अंगिकारल्याने सदैव आनंदात व सुखात .
©® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नीलकळ्या)🥀
(शतशब्द)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!