#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा (१/७/२५)
कथेचं शीर्षक :- ” कॉमेंट्स”
स्नेहा, एक व्हिडिओ अपलोड करते. राज्य पुरस्कारासाठी तो व्हिडिओ जाणार होता. अतिशय सुंदर व्हिडिओ. तिचं सादरीकरणही उत्कृष्टच. त्यावर खूप कौतुकाचा वर्षाव होत होता. छान कमेंट्स येत होत्या. त्यातलीच एक टीकात्मक कमेंट, डोक्यातून जातच नव्हती. इतकी वाईट कमेंट का केली असेल? ती नाराज झाली, दुखावली.
ती कमेंट मला एवढी का टोचतेय?. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच कमेंट वाचते आणि स्वतःलाच विचारते. त्या अनोळखी व्यक्तीच्या कमेंट मुळे मी का दुखावतेय?. तिने कमेंट डिलीट केली, मनातूनही. तिला जाणवलं नकारात्मकता पचवून शांत राहणं ही ताकद असते नाही का!.
तिच्या मनातला झगडा संपला. ती उठली, हसली, आत्मविश्वासाने आणि म्हणाली,” दुर्लक्ष करण्याचे कौशल्य म्हणजेच खरंच सुख आहे”!.
शब्द संख्या (१००)
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®
