स्वराने प्रेम विवाह केला होता. काही वर्ष मस्त मजेत घरी पण राजेश छोटे छोटे गोष्टीतून स्वराचा पाणउतारा करू लागला. मुलं लहान होती तोपर्यंत ठीक होतं, पण नंतर हे सारं स्वराला असाह्य होऊ लागला मग एक एक दुखणी सुरू झाली. हे सर्व पाहून सासूबाईंना पण स्वराची काळजी वाटू लागली शेवटी न राहवून सासूबाईने एक मोलाचा सल्ला दिला, “दुर्लक्ष करण्याचे कौशल्य वाढवणं म्हणजे ” सुख”, त्याप्रमाणे स्वराने राजेशच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली.शेवटी राजेशला त्याची चूक करून आली, तेव्हा त्याने स्वराची माफी मागितली आणि काळजी घ्यायला सुरुवात केली. सासुबाईंचा मोलाचा सल्ला खूप छान कामी आला. आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे.
©️®️ #सौ.अपर्णा जयेश कवडे.

