******* गम्य आनंदाचे *******
लग्नाला ६० वर्षे होऊन गेलीत पण खटके कधी थांबलेच नाहीत. घरातील पाखरे पिल्लांसह दूरदेशी घरटे बांधून स्थायिक झालीत. त्यांचा जोडणारा धागा फक्त फोनपुरतीच. खटकांना थांबा देण्यासाठी कोणीतरी मध्यस्थी लागेल ना!
अचानक एक दिवस आजीने आजोबांना त्यांनी कधीही न पाहिलेली संदुक उघडायला सांगितली. थरथरत्या हातांनी संदुक उघडून बघताच आत दोघांच्या नावाच्या दोन विणलेल्या टोप्या दिसल्या. आश्चर्याचा धक्का! आजोबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. आजीने त्यांच्या पाठीवरून शांतपणे हात फिरवला व सांगितले की ज्यावेळेस आपल्यात खटके उडत त्यावेळेस त्याकडे दुर्लक्ष करून तो वेळ मी आपली आठवण म्हणून टोप्या विणण्यात घालवला व त्यातच सुख मानले.
समस्येचे दुसरे अंग तपासले की मूळ समस्या चुटकीसरशी सोडवता येते.
शब्द संख्या 100..
……. अंजली आमलेकर…… १/७/२५
