# माझ्यातली मी
# शतशब्द कथा
30.06.2025
शीर्षक.. स्वर्गसुख
मुलीचा जन्म झाला आणि तिची आई खूपच खुश झाली पण वडिलांना बिलकुल मुलगी नको होती..त्यांना मुलगाच हवा होता.जर का मुलगी झाली तर मी तिचा स्वीकार करणार नाही हे त्यांनी आधीच सांगून ठेवले होते.घरी आल्यावर त्यांनी मुलीकडे बघितलेसुद्धा नाही
तिला जवळ घेणे तर दूर..आईच्या मनात तर अनेक प्रश्न होते.माझ्या मुलीच्या नशिबात का बापाचे सुख नाही? दुसऱ्याच क्षणी…. तिच्या मनात एक विचार आला की खरंतर त्यांच्या वागण्याकडे आता दुर्लक्ष करण्याचे कौशल्य वाढवायचेच आहे….तरच मला खरं सुख मिळणार… आणि खरंच एक दिवस तिच्या प्रयत्नांना यश मिळाले.. बाबांचे मन आता हळूहळू मुलीकडे वळले. आणि त्यांनी तिला छातीशी घट्ट धरले…आज तिला “स्वर्ग सुख” मिळाले होते..
……
100 शब्द
सौ. उर्मिला परूळकर
न्यूझीलँड
©️®️

