सुरेखाच्या संसारात एकच गोष्ट तिला खूप त्रास देत होती – तिच्या नवऱ्याचे, माहेरच्या गोष्टींवरून रोजचे बोलणे. “तुमच्या माहेरी असंच करतात,” माहेरावरून काहीबाही रोजच बोलत असे. सुरुवातीला सुरेखा दुःखी व्हायची, त्याला समजावण्याचा प्रयत्न करायची, वादही व्हायचे. पण रोजच्या भांडणाला कंटाळली.
एके दिवशी तिने वडिलांना सांगितले, वडिलांनी तिला समजावले, “बाळा तो म्हणाला म्हणून आम्ही तसे आहोत का, कोणाच्या वाईट बोलण्याने चांगला माणूस वाईट होतो काय?. तिने ठरवलं “बास्स! या गोष्टींवर लक्ष द्यायचं नाही?’ तिने राजेशच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून शांतपणे तिचे काम करत बसे.
दुर्लक्ष करण्याचे कौशल्य शिकल्याने मन शांत होऊन चेहऱ्यावर हसू आले.
कारण तिने नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या सुखाला प्राधान्य दिले होते.
~अलका
शत शब्द संख्या (100)


खूप सुंदर कथा