दिलेल्या चित्रावरून शतशब्दकथा (३०/६/२५)
कोणी निंदा.. कोणी वंदा….
ए, आजी त्या काळी तूझा व आबांचा प्रेम विवाह झाला, तोही तू आबांपेक्षा वयाने दोन वर्षांनी मोठी. कसं जमलं तूमचं? घरच्यांना मान्य होतं का? अगं, परी किती प्रश्न विचारशील. आबा, माझ्या बाबांकडे तबला शिकायला येत होते. नजरानजर झाली आणि प्रेमात पडलो. चोरून मंडईत भेटायचो. एकदा बाबांनी बघितले व आम्हाला सरळ दम भरला यापुढे एकमेकांशी बोलायचे नाही, भेटायचे नाही. यांचा तबला बंद केला.
तरीही आम्ही भेटत होतो. कारण आमचे एकमेकांवर खूप प्रेम होते. म्हणून आम्ही पळून जाऊन देवळात लग्न केले. येताजाता लोक टोमणे मारायचे. हळूहळू आम्हाला या गोष्टींची सवय झाली व दुर्लक्ष करायची कला अवगत झाली त्यामुळे आम्ही सुखाने जगायला शिकलो.
