#माझ्यातली मी
#शत शब्द कथा
#चित्रावरून (३०/०६/२०२५)
#शीर्षक:सुखाची गुरुकिल्ली
सरिता लग्न झाल्यापासून तिच्या जबाबदाऱ्या काळजीपूर्वक निभावत होती. पण तिची सासू नेहमी तक्रारीचा सूर लावायची. तिला त्यांचे टोमणे मारणे अजिबात आवडायचे नाही. त्यांच्या टोचून बोलण्यामुळे तिचा सगळा उत्साह निघून जायचा.
“कशाला करायचे आपले कर्तव्य? कितीही केले तरी त्या नावेच ठेवणार” असा विचार तिच्या मनात आला. त्याचवेळी तिचे सासरे, तिने केलेल्या आमटीचे तोंडभरून कौतुक करायला लागले. ते ऐकुन तिचा नवरा सौरभ एकदम खुश होऊन तिच्याकडे पाहून हसला. तिने ठरवले, “सौरभला साथ द्यायची. मग सासूबाई काही म्हणोत त्याकडे सरळ दुर्लक्ष करायचे.” त्या दिवसापासून तिच्या मनाची टोचणी कमी झाली आणि ती आनंदी राहू लागली. “टोमण्यांकडे दुर्लक्ष करणे” ही सुखाची गुरुकिल्लीच जणू तिला मिळाली.
©®राधिका गोडबोले
(शब्द संख्या 100)

Very very nice,Great kavita