#माझ्यातलीमी #MajhyatliMi #पुस्तकरिव्ह्यू #ब्लॉगस्पर्धा #लेखनस्पर्धा #BookReviewContest
#रहस्य
पुस्तकाचे नाव : रहस्य
लेखिकेचे नाव : राॅन्डा बर्न
पुस्तकाचा विषय : सकारात्मक विचार करुन जीवन सुखी करण्याचा मूलमंत्र
खरोखरच ‘रहस्य’ या पुस्तकात खुप मोठे रहस्य दडलेले आहे. आपण फक्त चांगला आणि सकारात्मक विचार केला तर हवं ते मिळवू शकतो. पण फक्त विचार करुन आपली ईच्छा पूर्ण होते का ..? तर याचं उत्तर ‘नाही’ असंच कुणीही म्हणेल, आणि स्वत: लेखिका देखील तेच म्हणतात. मग सकारात्मक विचार केल्याने वेगळं असं काय होतं? तर आपले विचारच आपल्याला त्या दृष्टिने वागायला, कार्य करायला भाग पाडतात.
आरोग्य, नौकरी, धन, नातेसंबंध, मानसिकता, कौशल्य या सार्या बाबतीत आपण कसे समृद्ध होवू शकतो त्याचे विविध उदाहरणांवरुन अगदि मुद्देसुद सांगितले आहे. त्यासाठी श्रीमती बर्न सांगतात विश्व सर्व बाबतीत परिपूर्ण आहे आणि त्यामुळेच आपल्याला हवं ते विश्वाकडून मिळवू शकतो, त्यासाठी आपल्याला आपले सकारात्मक विचार विश्वापर्यंत पोहचवावे लागतात. आता हे सकारात्मक विचार विश्वाला पोहचवायचे असतील तर आपण ‘नाही’ हा शब्द न उच्चारता हवं ते मिळवू शकतो .. जसं की मला असं म्हणायचं असेल, “मला वेळ नाही” तर, “मी कामात गुंतले आहे” असं म्हणता येईल.
हे सारं पटवून देण्यासाठी श्रीमती बर्न मनोवैज्ञानिक, तत्ववेत्ते, प्रभावी लेखक, मार्गदर्शक, उद्योजक, आंतर्राष्ट्रीय वक्ते यांचे विचार आणि अनुभव सांगतात.
या पुस्तकातील मला आवडलेली सर्वाधिक उत्तम गोष्ट म्हणजे कृतज्ञता! आपल्याजवळ जे जे आहे; पैसा, नाती, जीवनावश्यक वस्तू, आपलं शरीर – अवयव, अन्न, वस्त्र, आपली नौकरी किंवा व्यवसाय, नौकरीमधील हुद्दा, सहकारी, मित्र या सगळ्यांबद्दल आपल्या मनात कृतज्ञतेची भावना असयला हवी. एवढेच नाही तर आपण ती व्यक्त ही करायला हवी, तरच आपल्याला हवं ते मिळवता. आपण जर आपल्याकडे नसलेल्या गोष्टींबाबतच विचार केला तर आपण दु:खिच राहू आणि असलेल्या गोष्टींचा आनंदही घेऊ शकणार नाही. आणि खरोखरच आपण या पद्धतीचा अवलंब केला तर आपल्याला हवं ते ईच्छित साध्य करू शकतो.
राॅडा बर्न यांनी सांगितल्या प्रमाणे मी अनेक गोष्टि साध्य केल्यात.
एकदा माझं घड्याळ ⌚ हरवलेलं. सगळीकडे शोधूनही दिसेचना ! मग मी ‘रहस्य’ मधील तंत्राचा उपयोग केला. एका जागी शांतपणे डोळे मिटून बसले. घड्याळीची आकृती डोळ्यासमोर आणली. ज्या ठिकाणी घड्याळ असू शकतं त्या सर्व जागा डोळ्यासमोर आणल्या. शेवटचं ते कधी मनगटावर बांधलं ते आठवून बघितलं. मनगटावर ते कसं दिसतं ते दृष्य मनात बघितलं. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्याचा मला केंव्हा केंव्हा आणि कसा कसा उपयोग झाला ते आठवून त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याला धन्यवाद दिले. नंतर डोळे उघडले आणि नंतर ही गोष्ट विसरुन गेले की माझं घड्याळ हरवलंय. आणि अचानक दोन दिवसांनी मला ते एका कपाटात मिळालं. घड्याळ हरवलंय म्हणून मी दु:ख करत राहीले असते तर माझं इतर कुठल्याच कामात मन लागलं नसतं.
हिच गम्मत आहे या पुस्तकाची. हे एक जीवनातील चालती बोलती मार्गदर्शिका आहे. अनेक लोकांनी यातील मार्गदर्शक तत्त्वांचा आपल्या जीवनात उपयोग करून आपले जीवन सुखी आणि आनंदी केले आहे. या पुस्तकाचे, अर्थात राॅन्डा बर्न यांचे ब्रीदवाक्य आहे – “मी आनंदी, निरोगी आणि सामर्थ्यवान आहे” हे मनावर कोरून ठेवा आणि आपली स्वप्न पूर्ण करा.
मनिषा चंद्रिकापुरे

