त्याच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून एक अश्रू डोकावत होता.
म्हाताऱ्या आईचा हात सोडताना काळजाचा थरकाप झाला.
ती वृद्धाश्रमाच्या दारात पोहोचली, वारंवार मागे वळून पाहत होती.
“आई, माझा नाईलाज आहे गं…” एवढंच तो म्हणाला.
तिच्या आसू भरल्या डोळ्यात ,त्याच्या साठी होता फक्त आशीर्वाद !
