प्रेमनाद
कोसळे पाऊस असा
बेफाम बेभान होऊन
गंध गर्भातूनी पसरे
फुलला मातीचा कण कण
त्यात तुझे भिजणे
मन जाते वेडावून
जलधारांचा नाद
जणु पावसाने बांधले पैजण
रंग पानांचा हिरवा
त्यात प्रेमाची आण
दाही दिशा झळकल्या
सांडले कोणी सोनेरी कण
तुझ्या डोळ्यात पाऊस
काया गेली मोहरून
सोबत असता मी तुझ्या
काळे ढगही जातील विरून
पावसाने केली खोडी
डोळ्यातील काजळ पुसून
माझ्या सवे त्याचेही
जडले का ग तुझ्यावर मन
चिंब चिंब देह सारा
आता उरले ना कसले भान
सामावून जावू एकमेकात
शिवशक्ती सम जणू एक प्राण.
©® Author Sangieta Devkar
