#माझ्यातली मी
#शतशब्द कथा (चित्रावरून)
“आनंदाची वारी”
“माझं कामच माझी पूजा आहेची” असे म्हणत पत्रकारितेच्या कठीण क्षेत्रात ती जीवतोड मेहनत करीत होती. आज अगदी जोशात ती वारी कव्हर करायला निघाली होती. प्रत्येकाची वेगळी कथा आणि व्यथा जाणून घेत तिचा प्रवास सुरू होता. इतक्यात रिंगणात देहभान हरपून नाचणाऱ्या ह्या जोडप्याने तिचे लक्ष वेधून घेतले. तिने लगेच कॅमेरा सावरत त्यांचे फोटो, व्हिडिओ घेतले. वेशभूषेवरून साधारण वाटणारी ते दोघे, विठ्ठलाच्या नाम गजरात तल्लिन होऊन थिरकत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू लाखमोलाचे होते. पैसा आणि प्रसिद्धीसाठी जीवाचे रान करणारे अनेकजणं तिने आजवर पाहिले होते पण भक्तिरसात बुडालेले आनंदी चेहरे तिला आज वारीच्या निमित्ताने भेटले होते आणि जीवनाचा खरा अर्थ शिकवून गेले होते.
©®राधिका गोडबोले

If yu have written must be very very 👍But have to Learn Marathi to understand Thanks