#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा(२६/६/२५)

🌸वारी🌸

राधाक्का आणि सोपानदादा वारकरी ,वय जरी वाढलं तरी पावलं कधी थांबली नाहीत.
पण यंदा काळाने घाला घातला. आलेल्या साथीच्या आजाराने त्यांची लाडकी ज्ञाना काळाच्या पडद्याआड गेली.
राधाक्का खिन्न मनाने अंगणात उभी होती.
“या वर्षी वारी नाही होणार माझ्याने,” हा विचार तिला पोखरत होता.
तेवढ्यात सोपानदादा शांतपणे पुढे आले.
हळूच तिच्या डोक्यावर तुळशीचं वृंदावन ठेवून म्हणाले, “चाल पुढं…”
ती थबकली. वृंदावन थरथरलं. ओठ हलले नाहीत, पण डोळे बोलले.
तेवढ्यात टाळ-मृदंगाचा निनाद झाला. दोघं वारीकडे वळाले.
दुःख मागे पडत गेलं, आठवणी गहिवरल्या.
गोदेच्या तीरावर वारी थांबली होती.
राधाक्का आणि सोपानदादा विठ्ठलाच्या नामस्मरणात हरवून गेले.
त्यांच्या पावलांमध्ये वेदना होती, तरी भक्तीचा ठेका होता. प्रत्येक उडीमागे श्रद्धा होती पाय थकले होते पण आत्मा नाचत होता.
“वारी म्हणजे चालणं नव्हे, चालता चालता विठ्ठल होणं!”

प्रांजली डोरले
(शब्द संख्या १००)

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!