पायी दिंडी म्हणजे स्वर्ग सुखचं!
टाळ-मृदूंग,चिपळ्यांचा नाद,विठ्ठल नामाचा जयघोष, सगळं वातावरण कस भक्तिमय झाले होते.
विठूराया आणि रुक्मिणी माता पंढरपूरातून वारीचा आनंद घेत होते अन मनोमन हसत होते.
सगळे वारकरी विठू नामात दंग होते,परंतु हा मोह साक्षात विठुराया आणि रुक्मिणी मातेलाही आवरला नाही.
मग काय म्हणता,त्यांनीही मानवरूपात येऊनं भक्तांसोबत ताल धरला.
काय गोजिरं रूप हे पांडुरंगाचं!
ग्यानबा तुकारामाच्या गजरात भक्तांसमोर कधी प्रगट झाली हि माऊली डोईवर तुळस,लुगडं नेसलेली आणि विठुराया तर फेटा पांढर शुभ्र धोतर.मन प्रफुल्लित करणारा तो क्षण!
साक्षात देव आपल्या समोर प्रगट झालेत ही पुसटशीही कल्पना वारकऱ्यांना नव्हती.
बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल!
