🙏तिचा विठोबा त्याची माऊली🙏
लेक बाळंतपणाला आलेली, आणि म्हातारीने दरवर्षी प्रमाणे पाटलामागे लकडा लावला होता एकडाव दोन कोस माह्या बराबर वारीला चल.
शेवंते म्हातारी एकटीच तर गेली न्हव वारीला?पाटील बायकोला विचारते झाले.
आत्याबाई रात्री पासून बोलत होत्या
. तान्हं लेकरू घराला यायचं नाट नाही लावायचा पांडुरंगाला काळजी. फुडचा आखाड बघत नाही. तेव्हढी माझी बाय सुखरूप दोन जीवाची उलगडा होऊदे. अरेदेवा सकाळपासून आत्या दिसल्या नाहीत.
पाटलांनी वारीचा रस्ता धरला. वृंदावन घेऊन चालणारी आई दिसली .लेकाला म्हणाले पुढल्या मुक्कामापर्यंत म्हातारीसोबत जातो तू जा. गर्दीतल्या एकीची तुळस घेऊन आईजवळ आले. साठीच्या लेकराला नाचताना बघून म्हातारी हरखली आणि तुझा विठ्ठल वेगळा माझा वेगळा म्हणणार्या पाटलांना आईमध्ये विठ्ठल दिसला.
सौ.आसावरी प्रदीप बहिरट
