शतशब्दकथा

चित्रावरून शतशब्दकथा (२३/६/२५)

आनंदी जोडपे…

विठोबा आणि रखमा यांच्या लग्नाला चाळीस वर्षे झाली तेव्हा पासून ते दोघेही न चुकता वारी बरोबर पंढरीला पायी जायचे. दोघेही विठुमाऊलीचे भक्त. वारीत हि जोडी खूप आनंद व उत्साह आणायची. आपल्या बरोबरच्यांना मदत करायची. मुक्कामाच्या ठिकाणी या दोघांचा माऊलीच्या गाण्यावर नाच बघणे म्हणजे बाकीच्या वारकर्यांना आनंदाची मेजवानी असायची.

यावर्षी मात्र विठोबा एकटाच आला होता त्याची रखमा त्याला कायमची सोडून गेली होती व जाताना वचन घेऊन गेली होती की, दरवर्षी प्रमाणे तुम्ही वारीला जायचे त्याच आनंदात व त्याच उत्साहात नाच पण करायचा मी शरीराने नसेन पण मनाने मी तुमच्या बरोबर असेन. आपण कधीही वारी चुकवायची नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!