माझ्यातली मी समूह आयोजित —
श्री गणेश कथा –
श्री गणेश आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतो अशी श्रद्धा आहे . फार जुनी नाहीअगदि अशातलीच गोष्ट आहे अनुभवलेली कोणी त्याला अंधश्रध्दा म्हणेल कोणी योगायोग म्हणेल नाहीतर बोलाफुलाला गाठ पडली असे म्हणेल कांहीही असो मात्र घडले असे –
आमच्या शेजारीण काकूंच्या सुनेला लग्न होऊन सात आठ वर्षे झाली पण तिला संतान प्राप्ती होत नव्हती . औषधोपचार – अत्याधुनिक उपचार – देवधर्म व्रत वैकल्ये नवस उपास तापास जे कोणी सांगेल ते करायच्या . पण फळ मिळाले नाही सासू सुना दोघीही उदास झाल्या . शेवटी आता कांहीच करायचे नाही दैवाने व्हायचे असेलतर होईल . असे म्हणायच्या .
त्यांची ही अवस्था पाहिल्या नंतर आमच्या सासुबाईंनी आग्रहाने एक तोडगा सांगितला . एवढे करा म्हणाल्या . येणाऱ्या गणेश चतुर्थीला जो गणपती बसवाल तो विसर्जित न करता एका डब्यात वर्षभर घालून ठेवा .(म्हणजे त्याला कोंडून ठेवा) तोडगा अवघड नव्हता काकूनी होकार दर्शविला .
ठरल्या प्रमाणे त्यांनी येणाऱ्या गणेश चतुर्थिला गणपतीची स्थापना केली मनोभावे दहादिवस उत्सव साजरा केला आणि अनंत चतुर्दशीला त्याला डब्यात ठेऊन दिला . दिवस जात होते पण कांही घडत नव्हते बघता बघता वर्ष लोटले . गणेश चतुर्थी आली . दरवर्षी प्रमाणे गणेशाची स्थापना झाली पण घरात उदास वाटायचे . स्थापना झाली आणि तिसरे दिवशी अचानक सूनबाई चक्कर येऊन त्या गणपती ठेवलेल्या डब्या समोर पडली . काकूला वाटले आपण गणपती डब्यात कोंडून ठेवला महणून तर असे झाले नसेल ?घरातील सर्वजण घाबरले ताबडतोप दवाखान्यात ॲडमिट केले . तपासले .ती शुद्धीवर आली आणि काय आश्चर्य र्डॉ .नी गुडन्यूज दिली . काकू तुम्ही आजी होणार आहात . काकूचा आनंद गगनात मावेना . सुनेला जवळ घेतले . खूप केलेस गं तू . अखेर गणेशाने तुझे गाऱ्हाणे ऐकले लगेच त्या आमच्या घरी ती आनंदाची बातमी सांगायला आल्या . सासूबाईंनी लगेच देवापुढे साखर ठेवली त्यांनाही खूप आनंद झाला . त्यांचा तोडगा खरा झाला . काकूंनी अनंत चतुर्दशीला गणपती डब्यातून बाहेर काढला त्याची साग्रसंगीत पूजा केली आणि विसर्जन केले . म्हणाल्या तुझ्या रूपानं माझ्या सुनेच्या पोटात तू विसावला आहेस . पुढचे वर्षी तुझ्या दर्शनाला तो येणार .
. खरेच श्रीगणेश आपल्या मनोकामना पूर्ण करतो ह्याचा प्रत्यय आला ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण .
उषा पाटोदकर .
. .
