कवितेची कविता

कवितेची कविता……

अलवार क्षणांचा साज लेवून
क्षणात कधी सुचते कविता
अंतरात मृद्गंधित बिजातून
हळूवार कधी रुजते कविता…….

अवखळ माळेतून अवचित
दवबिंदूसम स्त्रवते कविता
निर्झरातून दिव्य प्रवाही
जीवन होउन झरते कविता……

शब्द शब्द मनी गुंफिता
हळवी कोमल सुचते कविता
आर्त भावना अंतरीतल्या
शब्दातून पेरते कविता…….

सांज सावळी दरवळताना
राधा होऊन सजते कविता
चिरंतन ज्योत अद्वैताची
निरंजनात तेवते कविता ……..

रुह…..❣️
रुपाली देव हंबर्डे.

2 Comments

  1. **mitolyn**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!