हक्काचा जोडीदार !
ही गोष्ट आहे ईशान आणि रियाची. त्यांचं नुकतंच लग्न ठरलं होतं आणि दोघेही ‘लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप’ मध्ये होते.
ईशान मुंबईत एका हाय-प्रोफाईल फर्ममध्ये होता, तर रिया पुण्यात स्वतःचं कॅफे चालवायची. लग्न ठरल्यापासून लग्नाच्या तयारीत ईशान इतका व्यग्र झाला होता की, त्यांचं बोलणं फक्त ‘हो’, ‘नाही’ किंवा ‘कामापुरतंच’ उरलं होतं.
शनिवारी संध्याकाळ पासूनच पुण्यात पावसाची उघडीप चालू होती आणि त्या रम्य वातावरणात रियाला ईशानसोबत बोलायची ईच्छा झाली! तिने त्याला फोन केला. “ईशान, आज पाऊस खूप सुंदर पडतोय, आपण थोडा वेळ बोलूया का? मला खूप आठवण येतेय रे तुझी…”🙂
ईशान लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होता. तो वैतागून म्हणाला, “रिया, प्लीज समजून घे ना यार! सोमवारी माझं प्रेझेंटेशन आहे.
आपण लग्नानंतर खूप गप्पा मारू, तेव्हा माझ्याकडे फक्त तुझाच वेळ असेल. आता थोडं ॲडजस्ट कर.” त्याने ‘कामाचं कारण’ देऊन फोन ठेवून दिला.
रिया खिडकीबाहेरच्या पावसाकडे बघत बसली. तिला समजलं होतं की ईशान ‘यश’ मिळवण्यात इतका बिझी आहे की तो ‘क्षण’ जगायला विसरलाय.
दोन तासांनंतर रियाच्या घराची बेल वाजली. रियाने घाबरतच दार उघडलं, तर समोर ईशान पूर्णपणे भिजलेल्या अवस्थेत उभा होता! त्याच्या हातात दोन गरम कॉफीचे कप आणि तिची आवडती फुलं होती.
रिया चकित होऊन ओरडली, “अय्या ईशान तू? तू तर म्हणाला होतास तुझं प्रेझेंटेशन आहे, तू बिझी आहेस?”
ईशानने तिला जवळ ओढलं आणि तिच्या केसांवरून हात फिरवत हळूच म्हणाला, “मघाशी फोन ठेवल्यावर मला जाणीव झाली की, सोमवारच्या प्रेझेंटेशनपेक्षा आजचा तुझा हा उदास आवाज माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. प्रेझेंटेशनसाठी तर मला रविवार पण आहे , पण तुला हव्या असलेल्या ‘वेळेचा’ हक्क मी कसा हिरावून घेऊ?”
त्याने पुढे म्हटलं, “प्रेसेंटेशन तर होईलच ग, पण तुझा माझ्यावर जो ‘हक्क’ आहे ना, त्यासाठी मला माझ्या कामाच्या फाईल्स पेक्षा तुझ्या सोबत गप्पा करणं जास्त महत्त्वाचं वाटलं.” कारण हे क्षेत्र येणार नाही आणि या सुखाची पुनरावृत्ती पण कधी होईल माहीत नाही!! खर ना
त्या रात्री पाऊस थांबला होता, पण प्रेमाची सर ओसंडून वाहत होती. ईशानने फक्त त्याचा वेळच नाही तर रिया आश्वस्त केलं होतं कि मी फक्त तुझ्याच हक्काचा आहे ,
आणि रियाच्या मनात ही सारखं येत होतं कि
“भेटवस्तू तर काय कोणीही देऊ शकतं, पण जो न आपला अमूल्य ‘वेळ’ जोडीदाराला देतो ना तोच खरा हक्काचा जोडीदार!”
कारण… हक्काची माणसं कारण नाही, वेळ देतात! ❤️ पावसाच्या सरींसारखीच त्यांची ही साथ सुखावह असते.🥰
✍️ र सि का
©️®️रसिका चवरे

