# माझ्यातली मी
# लघुकथा लेखन टास्क
15 डिसेंबर 25
काही नाती ही भाड्याच्या घरासारखी असतात कितीही जपली तरी आपली होत नाहीत
आपली ताई मृणाल च्या अॅक्सीडेंट ची बातमी फोनवर ऐकून सुमित काहीही विचार न करता मोटारसायकलने घाईने पोहोचला. तो पोहचेपर्यंत जणू त्याच्या ताईने प्राण रोखुन ठेवला होता.तो पोहचताच तिच्या एक वर्षाच्या कौस्तुभला साभांळण्याचे वचन भावाकडून घेतले. कदाचित तिला जाणवले असावे आपल्या मागे अशोक म्हणजे बाळाचे बाबा त्याला निट पाहू शकणार नाही. झाले तसेच मृणालला जाऊन तिन महिने होत नाही तो अशोकने दुसरे लग्न केले.
कौस्तुभ ची पुर्ण पणे जबाबदारी सुमित वर पडली. या जगात बहिणी शिवाय त्याला रक्ताच्या नात्याचे कोणीच नव्हते आता कौस्तुभ च त्याच्या जगण्याचा आधार होता.
सुमित हुशार व मनमिळावू मुलगा होता. युपीएससी ची परिक्षा पास करुन सरकारी नौकरी त चांगल्या पोस्ट वर होता
एक चांगली मुलगी पाहून लग्न करायचा विचार त्याने केला पण कौस्तुभ ला साभांळायला कोणीच मुलगी तयार होत नव्हती उलट त्याला होस्टेल ला ठेवा किंवा त्याच्या वडिलांकडे पाठवा असे सल्ले मिळायला लागले.
या सर्व प्रकारांनी त्रस्त होऊन शेवटी आपल्या लाडक्या भाच्यासाठी सुमितने लग्न न करण्याचा निर्णय घेतला .आपले सर्व लक्ष नौकरी आणि कौस्तुभ वर केद्रिंत केले. कौस्तुभ साठी पण मामा जीव की प्राण होता.
कौस्तुभ मृणाल चा मुलगा होता तसेच वडिलांचे पण काही स्वभाव गुण त्याच्यामध्ये आले होतेच. जसा जसा मोठा झाला तसा त्याचा स्वभाव थोडा स्वार्थी व रागीट झाला.कधी कधी त्यामुळे सुमित ला थोडे कठोर वागावे लागत असे.शिवाय आता आपला मुलगा मोठा होत आहे पाहून अशोकने सुद्धा त्याच्याशी सबंध वाढवले.
कौस्तुभ हुशार होताच तो उत्तम नौकरीत लागताच अशोकने मामाविषयी त्याचे मन कलुषित करुन आपल्या घरी नेले ज्याची वस्तू त्याने नेली अशी सुमितने मनाची समजुत काढली. अशातच कौस्तुभचे लग्न जुळल्याचे पण त्याला कळले आता लग्नात मामाचा मान तर माझाच आहे या विचाराने तो सुखावला.
कोणत्याही बोलावण्याची वाट न पाहता चार दिवस आधी लग्नघरी पोहचला पण तिथे अशोक सहित कौस्तुभने पण त्याच्याकडे दुर्लक्ष केले. .इतका मोठा अपमान त्याला अपेक्षित नव्हता. आपल्या ताईच्या आठवणीने त्याचे डोळे भरुन आले.वधुवरांना आशीर्वाद देण्याचे आपले कर्तव्य पार करुन तो तडक मडंपाबाहेर पडला.
शेवटी काही नाती कितीही जीव लावला तरी स्वार्थाचा स्पर्श होताच ती परकीच होतात. या गोष्टीची जाणीव त्याला झाली.
विनया देशमुख
शब्द संख्या… 310

Hb888casino, looking good! Casinos never get old. Always worth to explore more. check it out via this link: hb888casino