#माझ्यातलीमी#प्रामाणिक नजर व सौंदर्य
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
नजर
——
खरंच स्वस्त म्हणून दर्जेदार नसणार,
इम्पोर्टेड ब्रॅण्डेड म्हणजे भारीच ,खूप सुंदर
असे विचार म्हणजे प्रदूषित मानसिकता.
तो पोरवयात तसा ऑनलाईन महागड्या वस्तू मागवणारा.पण,परिपक्वता येत गेली तसे त्याचे
डोळे उघडले.
परदेशांतून येणारे पर्यटक वडीलांच्या दुकानात हात
मोकळा ठेवत खरेदी करायचे..खरंच,कला
पारखण्याचा विशुद्ध दृष्टीकोन.
तोही आता निर्यात करतो.स्वदेशीलाही प्रोत्साहन.
टाकाऊतून टिकाऊ बनवण्याच्या कलेकडे
पाहण्याचा निरोगी दृष्टीकोन आता कळलाय त्याला.
त्यातलं सौंदर्य कळल्यानं तो त्या कलाकारांनाही
भाव वाढवून देतो. परदेशांत कदरदार ग्राहकही
भरपूर मिळतात.तो खऱ्या अर्थाने सौंदर्याची
कदर करतो,विशुद्ध दृष्टीकोन ठेवतो, म्हणून
व्यापारात आत्मविश्वास बाळगू शकतो.
आणि आताशा चांगली किंमत मिळते
म्हणून पुरस्कार देताना नफा
शेअर करतो..कधीकधी कलाकारांसह.
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका

