#माझ्यातलीमी
#शुभदुपार
#विकएंडटास्क
#रेडिओशो
#मीआरजे
@everyone
#सुमधुर_गीतांजली
💚 सुमधुर गीतांजली 💚
हेलो, वेलकम, नमस्कार, मी तुमची लाडकी आरजे मीस मनिषा तुमचे स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ‘ सुमधुर गीतांजली ‘ मधे .. सीखींनो, दुपारचे ३ वाजले आहेत आणि तुम्ही तुमची सारी कामे आटोपून, दुपारचे जेवण करत करत रोज आमच्याशी जुळता, मी तुमचे मनःपूर्वक स्वागत करते…
आपण ऐकत आहात विविधभारती ९८.५ FM वर ..
(विवीधभारती चॅनल चे संगीत ऐकू येते)
चला तर मग सुरुवात करुया लता मंगेशकर यांनी गायलेल्या या सुमधुर गीताने ..
(गाणे सुरु होते ..)
“सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची…”
गाणं संपताच जाहीराती ऐकायला येतात ..
वाशिंग पावडर निरमा …
दाग, खाज, खुजली जड से मिटाए ..
नागपूरातील सर्वोत्तम इंजिनियरिंग काॅलेज, रायसोनी ग्रूप ….
आणि आता आरजे चा आवाज येतो …
लतादिदी म्हणजे माधुर्य, गोडवा, भक्तिमय सुगंध दरवळणारी सुमधूर सुरांची देणगी लाभलेली मूर्तिमंत देवी च जणू….
भाद्रपद महिना, गणेशाचे आगमन आणि रिमझिम रिमझिम पाऊस .. वातावरण पूर्ण आल्हादित झालंय ना ? अशा या प्रसन्न वातावरणात चला तर ऐकूया, हे उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेले युगल गीत –
“जीवन गाणे गातच रहावे … ”
लगेच दुसरे गाणे सुरु होते –
“प्रथम तुला वंदीतो .. ”
जाहीराती …
तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबाॅय …
मेरी मम्मी कहती है …. (कोलगेट ची जाहीरात)
क्या आप थका थका सा .. (न्युरोबीयाॅन ४० )
मैत्रीणींनो, आताच आपण ऐकलंत वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ‘अष्टविनायक’ या चित्रपटातील भक्तिमय गीत. आपल्या हिंदू धर्मात गणेश पूजन प्रथम करण्यात येते. आद्यपुजेचा मान आपल्या लाडक्या बाप्पाला मिळतो कारण तो विघ्नहर्ता आहे, बुद्धि आणि समृद्धीचे दैवत आहे. त्याच्याशी निगडीत पौराणिक कथा तर तुम्हाला माहितच असेल.
एकदा देवांमध्ये पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्याची स्पर्धा लागली. गणेशाने आपल्या आई-वडिलांना (शंकर-पार्वती) प्रदक्षिणा मारली आणि त्यांनाच पृथ्वीप्रदक्षिणेचे फळ मिळाले, कारण तेच त्यांचे सर्वस्व होते. त्यामुळे, त्यांना प्रथम पूजण्याचा मान मिळाला, असे सांगितले जाते.
आता आपण पुढील गाण्याकडे वळूया, पण तत्पूर्वी तुमच्या डोक्यात एक खाद्य देते, “रंग काळा पण कावळा नाही, लांब नागमोडी पण साप नाही, फुले वाहतात पण देव नाही ..” ओळखा बघू काय. मी परत येईपर्यंत उत्तर शोधून ठेवा हं …
गाणे :
“कोटी कोटी रुपे तुझी .. ”
सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या गाण्याला स्वतः सुरेश वाडकर यांनीच स्वरबद्ध केलं आहे. गणेशाची अनेक नाव अनेक रूप .. किती छान महिमा वर्णिली आहे यात. माझं अत्यंत आवडतं गाणं आहे हे!
चला तर पुढे वळूयात .. पण तत्पूर्वी कोड्याचे उत्तर ! तुम्हाला नक्कीच आले असेल ना .. तर उत्तर आहे केस.
बाप्पाचे दर्शन घ्यायला आणि त्याचा आशीर्वाद मिळावा यासाठी लांब लांबून लोक पवित्र स्थळी भेटी देतात. असेच एक दाम्पत्य चाललंय अष्टविनायकांच्या दर्शनाला, होडीने प्रवास करताना तो हेच गाणे गुणगुणतोय, तुम्ही पण ऐका ..
” नाविका रे, वारा वाहे रे…”
गाणे संपताच जाहिराती सुरू होतात ..
गले मे खिचखीच, व्हिक्स की गोली लो, खिचखीच दूर करो
दूध दूध .. अमूल दूध पिता है इंडिया
चाय एक स्वाद अनेक .. ब्रुक बाँड रेड लेबल
मी मनिषा पुन्हा एकदा तुमचे स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात .. सुमधुर गीतांजली मधे
आत्ताच आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या सुमधुर स्वरात हे अप्रतिम गीत
तर सखींनो आज आपण मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊन गणेशोत्सव साजरा करतो. याचे म्हणजेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे श्रेय जाते लोकमान्य टिळकांना.सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी १८९३ साली केली. ज्यामुळे लोकांमध्ये ऐक्य आणि राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली. त्यांचा मुख्य उद्देश होता लोकांना एकत्र आणणे, त्यांच्यात राष्ट्रवादाची भावना जागृत करणे आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी जनजागृती करणे. सार्वजनिक रित्या उत्सव साजरा करताना आपण लोकांच्या भावना जपाव्या, गोंधळ, घाई गर्दी करू नये, शांतता राखावी, ही काळजी घेतल्यास बाप्पाही खुश होतील.
मंगलमय वातावरण आणि भक्तिमय हृदय असलं की सकळही कशी आनंदी होते आणि आपसूकच आपल्या मुखी येत .. ‘ प्रभाती सूर नभी रंगती ‘, चला ऐकुया तर हे लता दीदींच्या भक्तिरसपूर्ण आवाजातील गीत ..
” प्रभाती सूर नभी रंगती, दस दिशा भूपाळी वदती .. ”
लगेच दुसरे गाणे सुरू होते ..
” मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला स्वीकारावी पूजा आतां उठी उठी गोपाळा … उठी उठी गोपाळा.. ”
जाहिराती :
मम्मा, चोकोस.. नहीं पहले मल्टिग्रेन .. ओके .. चोकोस.. यही तो है मल्टिग्रेन
हमारा बजाज, हमारा बजाज
पावसाळ्यात कपडे आत सुकवले .. आता वास येणार .. नाही, सुगंध दरवळणार .. वापरा कम्फर्ट ..
आत्ताच आपण ऐकलत कुमार गंधर्व यांच्या खड्या आवाजातील अंतःकरणात भिडणार हे नादमधुर भक्तिगीत. मात्रिणींनो तुम्हाला माहीत आहे का कुमार गंधर्व यांना दम्याचा त्रास होता त्यामुळे त्यांना गायन शिकण्यास खूप अडचणी आल्या. सप्तकात सूर लावताना त्यांना लांब तान घेताना त्रास घ्यायचा, त्यासाठी श्वास रोखून ठेवावा लागतो पण त्यांच्या आरोग्यातील समस्येमुळे ते त्यांना जमत नसे. यावर त्यांनी स्वतःच उपाय काढला ज्या श्वासाच्या त्रासामुळे गायनात अडचण यायची त्यालाच त्यांनी आपली शक्ती बनवली, श्वासाचा योग्य त्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात उपयोग करून त्यांनी आपली गायन पद्धती विकसित केली. याला म्हणतात निष्ठा, समर्पण, चिकाटी आणि आवड.
याच पार्श्वभूमीवर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजातील हे भक्तिगीत..
” केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा .. ”
जाहिराती लागतात ..
आधी मला थंड वस्तू खाताना दात दुखायचे मग माझ्या डेंटिस्ट ने मला सेन्सॉडीन वापरायला सांगितलं .. आता मला फ्रिज मधून काही काढून खायच असेल तर विचार करावा नाही लागत..
दोस्तों, घर मे मेहमान आने वाले है, और ये बद्बू.. नहीं अब आया है गोदरेज एअर फ्रेशनर
इतने सभेद बाल, ये शायद मुझे गुर रही.. ट्वेंटी फोर.. ट्वेंटी फोर सभेद बाल .. … गोदरेज हेअर कलर..
वेलकम बँक ..
सुमन कल्याणपूर यांच्या गळ्यातील गोडवा मंत्रमुग्ध करतो.
गणेशोत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला येतो हे आपण सगळेच जाणतो. पण भाद्रपद महिन्यातच का येतो त्याच ही एक विशिष्ट प्रयोजन आहे.
भगवान शिवाने भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेशाचे पुनरुज्जीवन केले, जो गणेश चतुर्थी उत्सव म्हणून साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला गणेशाने महाभारत लिहायला सुरुवात केली, गुरुवर्य व्यासांनी सांगितले आणि ते लिहित गेले. अशीही एक मान्यता आहे, म्हणून हा दिवस गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. सतत दहा दिवस लेखन केल्यानंतर त्यांचे शरीर तापले. ते थंड करण्यासाठी दहा दिवसानंतर म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन केल्या जाते (झी युवा वरील ” देवाशप्पथ ” या मालिकेतून)
तर आता ऐकुयात आशा भोसले यांच्या आवाजातील हे भक्तिगीत पण तत्पूर्वी आणखी एक कोडे ..
रंग हिरवा पण झाड नाही, आकाशात उडतो पण विमान नाही, बोलतो पण मनुष्य नाही .. ओळखा बघू आणि सोबतच या गाण्याचा आस्वादही घ्या ..
गाणे लागते:
” ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर समोरी बसले, मला श्री दत्तगुरु दिसले .. ”
जाहिराती:
मम्मी भूक लगी.. बस दो मिनिट .. मॅगी मॅगी मॅगी .. दो मिनिट मे तय्यार .. बच्चो की पसंद मम्मी की दूर टेन्शन
आपल्या आयुष्याचा जीवनसाथी निवडण्याचे योग्य ठिकाण अनुरूप विवाहसंस्था, आम्ही फक्त लग्न जुळवतच नाही तर टिकवतोही, आजच आमच्या वेबसाईट ला भेट द्या.
खरचं, हे गाणं ऐकलं की वाटतं दत्तगुरु समोरच बसले आहेत आणि आपल्यावर त्यांची कृपादृष्टी आहे. तर मैत्रिणींनो सखींनो कसा वाटला आपला आजचा सुमधुर गीतांचा भक्तिमय प्रवास .. आम्हाला नक्की कळवा. आता मी आरजे मिस मनिषा तुमचा निरोप घेते .. सॉरी, सॉरी, सॉरी .. कोड्याचे उत्तर राहिलेच की .. तुम्ही अगदी बरोबर ओळखलत .. उत्तर आहे पोपट. आणि आता शेवट करते या गणेश प्रार्थनेने .. आणि निरोप घेते .. बाय बाय .. उद्या परत भेटू आपल्या याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे .. सुमधुर गीतांजली .. नमस्कार!
शेवटचे गाणे लागते ..
” जयदेव जयदेव मंगल मूर्ती, हो मंगल मूर्ती .. ”
कार्यक्रम संपतो
@ मनिषा चंद्रिकापुरे (१२/७/२५)

