हम्म सुंदर तर ती आहेच पण एका भेटीत का प्रेम होत. काही ही तुझ निक्या. पहिली नजर पहिला प्यार अस तुम्ही रायटरच म्हणता ना?
बघू असेल पुन्हा नशिबात भेट तर,होप सो.मितेश हसत म्हणाला.
मग दोघांनी जेवण केले आणि निखिल घरी गेला.
मितेश रूम वर आला लॅपटॉप घेवून बसला आणि नकळत एफ बी वर आर्या ला शोधू लागला.पण नुसते आर्या नावाने ती थोडीच सापडणार होती? त्याचा विरस झाला.त्याने लॅपटॉप बंद केला.आणि झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो मेहता कडे जाणार होता.सकाळी काय करावे हा विचार करत होता.मग त्याने ठरवले की आता अंबाबाई ला जावून यायचे. कोल्हापूर ला येवून देवीचे दर्शन घेणार नाही अस कोणीच करणार नाही.सो त्याने निखिल ला कॉल लावला.निखिल ला मंदिरात यायला सांगितले.मितेश ही तयार होऊन मंदिरा कडे आला. इथे भाविकांची नेहमीच गर्दी असे. बाहेरून येणारे पर्यटक,स्थानिक लोक देवीला आवर्जून येतात,त्यामुळे बारा महिने मंदिरात गर्दी असते.निखिल येवून थांबला होताच.दोघांनी देवी चे दर्शन घेतले. बाहेर येवून थोडा वेळ मंदिराच्या आवारात बसले. निखिल ने विचारले,मित्या त्या मेहता कडे कधी जाणार आहेस?
आज संध्याकाळी बोलवले आहे त्यांनी.. मितेश
त्यानंतर काय करणार आहेस?
काही नाही नीक्या आपण रंकाळया वर जावू मस्त बोटिंग करू.
चालेल मला निघताना कॉल कर.
चल दिलीप कोल्ड्रिक्स ची मस्तानी खावू मग निघू मितेश म्हणाला.
नेकी और पूछ पूछ, चलो..निखिल उठून उभा राहिला.
ते दोघे मंदिराच्या मागच्या दरवाज्या मधून चालत दिलीप कोल्ड्रिक्स कडे निघाले.मंदिरा जवळ चा हा रस्ता कायम गर्दी ने भरलेला असायचा. कैरी, चिंचा, आवळा,विकायला बसलेले लोक,लेडीज सामानाची दुकाने,बांगड्या,टिकल्या,देवाचे साहित्य त्यामुळे इथे गर्दी कायमच.दोघे गप्पा मारत निघाले. महाद्वार रोड क्रॉस करायला थांबले आणि मितेश ने समोर पाहिले, रिक्षा स्टॉप जवळ कॉर्नर ला आर्या..हो नक्की तीच होती, ॲक्टीव्हा सुरू करत होती.पिंक शॉर्ट टी शर्ट ,ब्ल्यू जिन्स डोळ्या वर गॉगल एकदम सुंदर दिसत होती . ब्युटीफूल… निक्या समोर बघ मितेश म्हणाला.
अरे कुठे मितेश?
अरे रिक्षा स्टॉप जवळ बघ.ती मुलगी
निखिल ने पाहिले… वा काय मस्त आहे रे.
अरे हीच ती आर्या, काल मला बस मध्ये भेटलेली.
मितेश मग चल लवकर,बोल तिच्याशी.
हे दोघे रोड च्या पलीकडे जावू पर्यंत आर्या गाडी सुरू करून निघून गेली होती.
ओह नो बॅड लक निखिल म्हणाला.भेटली असती तर मोबाईल नंबर तरी घेतला असता.
जावू दे रे सोड.मितेश म्हणाला.मग ते दोघे कोल्ड्रिक् हाऊस ला आले. एका रिकाम्या टेबल पाशी बसले.पण मितेश ची नजर रोड वरच होती,जणू आर्या पुन्हा त्या रोड ने येणार होती.
त्याला बघून निखिल म्हणाला,ये मजनू सोड तिचा विचार गेली ती कधीच.
हमम..आय नो.मितेश हसत बोलला.
दोघांनी मस्तानी ची ऑर्डर दिली.संध्याकाळी भेटू म्हणत मितेश हॉटेल कडे निघाला.रूमवर आल्यावर परत त्याला आर्याचा विचार
अस्वस्थ करू लागला.आपण तिला आवाज देवून थांबवायला हवे होते असे त्याला वाटू लागले. बट इट्स टू लेट.
क्रमशः..मितेश ला आर्या भेटेल का? बघुया पुढील भागात.तो पर्यंत वाचत रहा.आणि कमेंट्स नक्की करा.
साहित्य कॉपी किंवा चोरी करणे कायद्याने गुन्हा आहे.
