साथ दे तू मला ( भाग ४)

त्याला हर्ट करणं  तिला जमायचे नाही. नकळत मितेश च्या मनात आले की छोट्या छोट्या गोष्टी साठी सुद्धा जुई त्याला दुखवत नवहती मग  इतका टोकाचा निर्णय घेऊन ती कायमचे मला दुखवून  कसे गेली? रायटर असणं आपली हॉबी करियर म्हणून निवडण  हा काय गुन्हा आहे का? पोटा पुरते तो नक्कीच कमवत होता. बाकी तो ऍड,पोसटर्स बनवणे याची ही कामे  घ्यायचा. पण जुई च्या घरच्यांना असा त्यांच्या भाषेत  कंगाल कवी रायटर जावई म्हणून नको होता. आणि जुई एकुलती एक त्यामुळे तिला इमोशनल ब्लॅकमेल करून माझ्या पासून कायमचे तोडले.  मग तिचा ही नाईलाज झाला.कधी कधी वाटत कवीच्या हृदयाला जो पर्यंत जख्म होत नाही तोपर्यंत तो कवी म्हणून ओळखला जात नाही का? कोणती तरी वेदना उराशी बाळगतच त्याने जगायचे हा बहुतेक लेखकांना देवाचा शापच असावा. बस चा हॉर्न वाजला  तसा मितेश त्याच्या विचारातुन बाहेर आला. सर्व प्रवासी बस मध्ये चढले. पुन्हा तो कुठला तरी रटाळ सिनेमा सुरू झाला. आर्या अगोदरच तिच्या सीटवर येऊन बसली होती. मितेश ही पुन्हा मोबाईल वर गेम खेळत बसला. आर्याला बहुतेक  गाण्याचं वेड होतं ती पुन्हा हेड  फोन घालून बसली. डोळे बंद केले तिने. मितेश ने सहजच तिरक्या नजरेने तिच्या कडे बघितले. ती फार सुंदर दिसत होती. खिडकीचा पडदा बाजूला केला होता सो मावळतीच्या सूर्याची केशरी किरणे तिच्या चेहऱ्यावर एकवटली होती. त्यामुळे ती अजूनच छान दिसत होती. तो मनातच  म्हणाला हे काय  होतंय मला. का मला तिच्या कडे  पाहण्याचा मोह होतोय? का मी इतका तिच्या कडे ओढला जातोय? हीच सौंदर्य माझ्या मनाचा ताबा घेऊ पाहतय. इतक्या लवकर आपण जुई ला विसरून आर्या मध्ये गुंतत चाललो आहोत काय? नाही असं नाही होऊ द्यायच. नको ते प्रेम,पुन्हा तो त्रास,तो दुरावा,त्या आठवणी . आपण एकटे आहोत तेच ठीक आहे. असा विचार करत तो पुन्हा गेम मध्ये गुंतला. बास आता हीचा विचार मनात येऊ द्यायचा नाही. अर्धा पाऊण तासात कोल्हापूर येईलच मग हिच्याशी आपला काही ही संबंध येणार नाही. असा विचार त्याच्या मनात येऊन गेला.ही आर्या परत काही आपल्याला  भेटत नाही इथं पर्यंतच तिचा संबंध होता. बहुतेक तो तिला लाईक करू लागला होता कारण आर्या तितकी सुंदर होतीच की कोणीही तिच्या प्रेमात बघताक्षणी पडेल. तो ही त्याला अपवाद नवहता. पुन्हा ही भेटेल की नाही  देव जाणे असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. पण तो काहीही करू शकत नवहता. बस व ऐव्हाना कोल्हापूरच्या त्या भव्य  कमानी जवळ आली होती. आर्या ने त्याच्या कडे बघितले  म्हणाली,ओके  देन नाईस टू मिट यू मितेश . मी आता उतरणार आहे इथे.ओके म्हणत त्याने हात  पुढे केला तिने त्याला शेकहँड केला आणि  बाय म्हणाली. क्षणभर अंगावर मोरपीस फिरल्याचा भास त्याला झाला. ती पुढे  निघून गेली .तिने ड्राइवरला रूईकर कॉलनी जवळ बस थांबवण्यास सांगितले. मितेश तिच्या कड कडेच बघत होता. वेडा झाला होता तो. पण ती पुन्हा भेटणार नाही याची रुखरुख त्याला लागून राहिली. रूईकर कॉलनी जवळ आल्यावर आर्या ने मागे वळून पाहिले आणि  मितेश ला पुन्हा एकदा बाय केले आणि ती खाली उतरली. मितेशला हॉटेल अयोध्या ला जायचे होते सो त्याचा शेवटचा स्टॉप होता. बस CBS ला थांबली. खाली उतरून मितेश ने निखिल ला कॉल लावला. तासा भराने हॉटेल कडे ये एकत्र डिनर करू असे त्याने निखिल ला सांगितले.मितेश ने रूम घेतली आणि तो फ्रेश होऊन कॉफी पीत बसला होता. आर्याचा विचार त्याच्या मनात आला. ती कुठे रहात असेल? ती भेटेल का पुन्हा?या दोन दिवसात  ती भेटायला हवी अस त्याच मन पुनःपुन्हा म्हणत होत.तस जुई च्या नन्तर त्याने  असा विचार केलाच  नवहता म्हणजे प्रेमाचा विचार सोडून दिला होता. पण आर्याला पाहून मन पुन्हा हळवं होऊ लागलं होतं. किती ही नजर अंदाज  केलं तरी आर्यांचा विचार  मनातून जात नवहता. तो कॉफी चा कप घेऊन खिडकी जवळ उभा राहिला रस्त्यावरील वर्दळ बघत आर्यांचा विचार बाजूला करत राहिला. कॉफी संपल्यावर त्याने मेहतांना फ़ोन लावला आणि उद्या भेटू  असे ठरवले. आठ वाजता  निखिल रूमवर आला . दोघे एकमेकांना भेटले .कॉलेज पासुनचे खास फ्रेंड होते ते  दोघे.  निखिल ला बघून मितेश म्हणाला,वा निक्या मस्त तब्येत  झाली तुझी. मग काय आमचं कोल्हापूर आहे म्हंटल अस्सल रांगड  तुमच्या पुण्या सारख मिळमिळीत नाही काही. निखिल. साल्या चार वर्षे पुण्यात राहिलास ,खाल्ला पिल्लास ना? मितेश. काय करणार नाईलाज होता राव  शिक्षणा साठी राहिलो. पण तू का असा वाळलास मित्या? निखिल. ऐ मी आहे तसाच आहे काही वाळला बिळला नाही . मितेश. अजून जुईचाच विचार करतोस काय? . निखिल. नाही रे ती आहेच कायम मनात,हृदयात  तिचा विचार नाही करत. मितेश. हम्म पण फेमस रायटर झालास तू मित्या  खूप छान वाटलं आणि अभिमान सुद्धा. निखिल. निक्या चल आपण खाली डायनिंग लाच जेवायला बसू जरा 2/4 शॉट्स पण मारू

क्रमशः..कथा आवडते का? प्लीज like and comment..

5 Comments

  1. Тяговые аккумуляторные https://ab-resurs.ru батареи для складской техники: погрузчики, ричтраки, электротележки, штабелеры. Новые АКБ с гарантией, помощь в подборе, совместимость с популярными моделями, доставка и сервисное сопровождение.

  2. Продажа тяговых АКБ https://faamru.com для складской техники любого типа: вилочные погрузчики, ричтраки, электрические тележки и штабелеры. Качественные аккумуляторные батареи, долгий срок службы, гарантия и профессиональный подбор.

  3. Надежный источник https://accounts-shop-gg.com предлагает возможность подобрать профили для таргета. Когда вы планируете купить Facebook-аккаунты, чаще всего важен не «одном логине», а в качестве фарма: стабильный запуск, наличие пройденного ЗРД в Ads Manager и правильно созданные ФП. Мы оформили понятную навигацию, чтобы вы сразу понимали какой лимит выбрать перед заказом.Навигация по теме: чек-лист проверки токена. Важно: покупка — это только вход. Дальше решает подход к запуску: какой прокси используется, как шерите пиксели без риска банов, как реагируете на полиси и как дублируете кампании. Ключевое преимущество данной площадки — это наличии масштабной образовательной секции, в которой собраны свежие мануалы по запуску рекламы. Мы поможем, как грамотно привязать карту, чтобы не словили Risk Payment и дольше жили в аукционе . Переходите в сообщество, изучайте практичные разборы банов, наводите порядок и масштабируйтесь с помощью нашего сервиса уже сегодня. Дисклеймер: используйте активы законно и с учетом правил Meta.

  4. Мультимедийный интегратор айтек интеграция мультимедийных систем под ключ для офисов и объектов. Проектирование, поставка, монтаж и настройка аудио-видео, видеостен, LED, переговорных и конференц-залов. Гарантия и сервис.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!