#माझ्यातलीमी
#कथालेखन
#शतशब्दकथा (१/९/२५)
#निरोप
#साथ_दे_तू_मला
💔 साथ दे तू मला 💔
मधुरा मोबाईल मध्ये व्यस्त होती .. स्क्रोल करत सोशल मीडिया च्या रिल्स, पोस्ट बघत होती, चेहऱ्यावर आनंद नसून दुःख होते. डोळ्यातून पाणी गळत होते.
“ए मधुरा ..” आईची हाक आली.
“हो आई! आलेच ..” आवाज रडवेला होता.
मोबाईल ठेवून ती स्वयंपाक घरात गेली.
“किती वेळ तो मोबाईल बघणार?! .. पुरे आता.. गेलेलं माणूस येत का परत? जितक्या वेळ बघत राहशील जास्त त्रास होईल तुला.” आईने समजावले.
“आई, पण इतक्या लहान वयात कशी गेली ती!! माझी फेवरेट होती ना ग प्रिया ताई! किती गोड हसायची. दिसायची पण किती सुंदर. तिचा प्रत्येक सिनेमा, मालिका बघितली ना आपण. खलनायिका असायची पण तरीही तीच आवडायची. प्रमुख भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीपेक्षा प्रियाच सुंदर दिसायची. एक नंबर अभिनय करायची.’
“खरं आहे तुझं.. मलाही खूप वाईट वाटतंय. हे वय नाही ग जायचं. ‘साथ दे तू मला’ मधे होती आणि आता सगळ्यांचीच साथ सोडून गेली. सिने सृष्टी सोबतच आपल्यालाही तिचा विरह असह्य आहे. ती आता पडद्यावर, टीव्हीवर दिसणार नाही .. खरच नाही वाटत. आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य गेलाय असं वाटतं. टीव्ही वरचे कलाकारही आपल्या जीवनाचाच भाग बनून जातात.”
“पण आता पुरे कर हो. ती आता नसली तरीही तिच्या मालिकांच्या माध्यमातून आपल्याला भेटत राहील. तेवढंच सुख मानायच.”
शंतनु निरोप देतानाही म्हणाला असेल , “प्रिया ,साथ दे तू मला ..”
©️®️ मनिषा चंद्रिकापुरे (१/९/२५)
शब्दसंख्या : १९८ (टिप सोडून)
टिप: मराठी अभिनेत्री प्रिया मराठे चे काल दुःखद निधन झाले. तिच्या जाण्याने चित्रपट, मालिका सृष्टीत एक पोकळी निर्माण झाली. ही बातमी ऐकून स्वतःच्या मनातले तिच्याबद्दलचे विचार आणि तिच्या जाण्याची हळहळ या कथेतून मांडण्याचा प्रयत्न केलाय. तिच्या आत्म्यास शांती मिळो.. 🙏🏻


अप्रतिम…I like Priya very much .
Thank u
👍👍👌👌👌
Thank you so much mam