सरत्या वर्षाची शिकवण

# माझ्यातली मी
# विकेंड टास्क
# विषय….. गुडबाय 2025

सरत्या वर्षाची शिकवण

औरंगाबाद सारख्या शहरातील ती एक सोसायटी…. श्रीकृष्ण विहार… सात मजले असणाऱ्या सातच बिल्डींग . सर्व साधारण मध्यमवर्गीय लोकांची वसाहत. खुप नाही फक्त पाचच वर्षे झाली होती सोसायटी तयार होऊन .सुरवातीला असणाऱ्या उत्साहानुसार सर्व गणपती,नवरात्र, होळी, तिळगुळ समारंभ,नवीन वर्षाचे स्वागत एकत्र येऊन छान साजरे होत असत.

गेल्या वर्षी मात्र यात बदल झाला कारण होते 31 डिसेंबर एन्जॉय करतांना मध्यमवयाच्या सर्व पुरुषांचे ड्रिंक करणे जे महिला वर्गाला मुळीच आवडत नव्हते . या वर्षी त्यांनी अट घातली की नवीन वर्षाचे स्वागत करतांना नो ड्रिंक, खायचे हवे ते पदार्थ मागवा. परंतु पुरुषांना ते मान्य नव्हते. परिणामत: शेवटी महिलांनी आपली पार्टी वेगळी केली त्यांनी सोसायटी च्या मागच्या मोकळया जागेवर आपली जागा निश्चित केली. पुरुषांना तर बंदिस्त च जागा हवी होती त्यांनी क्लब हाऊस बुक केले. हे सर्व पाहून सोसायटी च्या यंग जनरेशननी आई बाबा दोघांसोबतही न जाता स्वतःची वेगळी टिम केली व सोसायटी च्या गार्डन मध्ये बैठक जमवली .लहान मुले आई समवेत तर सिनीअर सिटीझननी घरीच राहणे स्विकारले. अशाप्रकारे एका सोसायटीत तिन ठिकाणी एन्जॉयमेंट सुरु झाली.

खालच्या ग्राउंड फ्लोअर वर राहणारे एक कुटूंब मकरंद आणि कोमल पैकी कोमल मात्र यात सहभागी झाली नाही कारण तिचा नववा महिना संपत आला होता दगदग व आवाज सहन होणार नाही म्हणून तिने सहभागी होण्याचे टाळले .शिवाय दुसऱ्या दिवशीच ती बाळंतपणासाठी गावातल्याच तिच्या माहेरी जाणार होती. रात्री तिला दरवाजा उघडावा लागू नये म्हणून दार बाहेरुनच बंद करुन मकरंद क्लब हाऊस मध्ये निघून गेला.
तिनही ठिकाणी आपपल्या पद्धतीने पार्टीला सुरवात झाली. महिला वर्ग गोष्टी गप्पा मध्ये रंगला.पुरषवर्ग ग्लास मध्ये डुबला. यंग जनरेशननी पिझ्झा, बर्गरवर ताव मारला.
साधारण अकराच्या सुमारास खाऊन खाऊन तसेच बसून कंटाळाल्याने रोमील व अमीत पाय मोकळे करायला फेरफटका मारायला लागले फिरता फिरता मकरंदच्या घराजवळ त्यांना कुणाच्या तरी विव्हळण्याचा आवाज आला. कोमलची परिस्थिति सर्वांना माहित होतीच हा नक्की त्यांचाच आवाज आहे हे ओळखायला वेळ लागला नाही. दार वाजवले पण कोमल दार उघडण्याच्या परिस्थितित नसावी.
,ते दोघेही घावतच क्लब हाऊस मध्ये पोहचले. तिथे पाहतो तर काय एकही जण ऐकण्याच्या स्थितीत नव्हता.मकरंदला तर शुद्धच नव्हती. शेवटी रोमीलने त्याच्या खिच्यातून घराची चावी घेतली व ते कोमलकडे घावले. दार उघडताच वेदनेने तडफडणारी कोमल पाहताच अमित ओरडला
रोमील पटकन गाडी काढ अन जाता जाता बाकींना पण सांग.
सारे धावत आले रोमीलने गाडी आणताच अमित ,सारंग, निरज,आकाश यांनी कोमलला अलगद गाडीत ठेवले. साक्षी आणि प्रियल गाडीत सोबत बसल्या बाकी इतर आपल्या मोटारसायकल वर दवाखान्याच्या दिशेने आधीच निघाले होते जेणे करुन तिथे सर्व सुचना देता यावी. कोमलला धिर देत गाडी दवाखान्यात पोहचली सर्व स्टाफ तयारच होता . कोमलला पाहताच डॉ. नी तिला सरळ लेबर रुम मध्ये नेले. तपासणी करुन ताबडतोब सिझरेयीन करावे लागणार असे सांगितले. ऐव्हाना बाकी महिला मडंळा पर्यंत हि बातमी गेली होती. त्यापैकी काही जणी दवाखान्यात हजर झाल्या. आज त्याच्या पैकी डॉ. असलेली पल्लवी पण एका कॉन्फरन्स साठी गेलेली होती .ती असती तर खूप मदत झाली असती. आता ऑपरेशन पेपर कुणी साईन करायचे प्रश्न होता कारण मकरंद दवाखान्यात येण्याच्या अवस्थेत नव्हता .शेवटी डॉ. पल्लवी सोबत फोनवर बोलून व परिस्थिति लक्षात घेऊन स्थानीक डॉ. नी निर्णय घेतला अन श्रीकृष्ण विहार मध्ये एका गोड परीचे आगमन झाले. आज यंग जनरेशनच्या सजगतेमूळे दोन जीव सहीसलामत होते.
इकडे पुरुषांच्या पार्टी त पण बातमी समजली पण कमी जास्त प्रमाणात सर्वांची अवस्था सारखीच होती मकरंदला तर दोन लोकांनी घरी पोचवले होते. आतापर्यंत कोमलला पण विशेष केअर रुममध्ये शिफ्ट केले होते. तोपर्यंत मुलांनी आपल्या आईकडून कोमलच्या माहेरची माहिती घेवून तिच्या आईला दवाखान्यात आणले तेव्हा सर्व निर्धास्तपणे घरी वापस आले मात्र मकरंदला वाचवण्यासाठी साठी तो तातडीच्या कामासाठी बाहेर गेला आहे व सकाळी येईलच असे त्यांना सांगावे लागले.
ईकडे रात्री मकरंद भानावर येताच कोमल घरी नाही पाहून प्रथम चक्रावून गेला त्यात मी. जाधव व मी. देसाई ना आपल्या घरी पाहून त्याला समजेनासे झाले. सर्व हकीकत कळताच तो रडायला च लागला. एका ड्रिंक च्या मोहापायी आपल्या कडून किती मोठी चुक झाली याची जाणीव त्याला झाली. मुलं जागृत होते म्हणून कोमलला मदत मिळाली अन्यथा काय झाले असते असा विचार करतच दवाखान्यात पोचला.गेल्या गेल्या प्रथम कोमलची माफी मागितली .सुदंर अशा गोड परीकडे पाहत तिने पण नव्या बाबाला माफ केले.
आज श्रीकृष्ण विहार मध्ये नवीन वर्षाचा आनंद द्विगुणित झाला होताच पण सोबतच कालच्या प्रसंगाची चर्चा पण होती त्याच सोसायटी मध्ये राहणारे नानासाहेब धर्माधिकारी एक रिटायर्ड जज्ज होते. आता वयोमानानुसार ते फारसे कोणत्याही कार्यक्रमास येत नसत पण कुणी काही विचारले तर मात्र त्याला नक्की मदत करत कालची घटना त्याच्या पर्यत पोचली होतीच.
त्यांनी सायंकाळी पाच वाजता सोसायटीची मिटिंग बोलावून सर्व लहान मोठ्या लोकांना आमंत्रित केले. काल रात्री च्या घटनेवर खेद व्यक्त केला .नवीन जनरेशनचे प्रसंगावधान राखल्या मूळे कितीतरी कठीण प्रसंग टळला म्हणूक कौतुकही केले.
पुढे ते सर्व पुरुषांना उददेशुन बोलले की ड्रिंक करावे की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे पण सोसायटीत ला एक जबाबदार वरीष्ठ म्हणून सांगावेसे वाटते कीसोसायटीचेा कार्यक्रम हे एक कौटुंबिक कार्यक्रमासारखे साजरे करावेत .कोणत्याही प्रकारच्या व्यसनाचा तिथे प्रवेश नसावा. तरच आपसात मतभेद कमी होतील व एक आदर्श निर्माण होईल काल ही मुले जर मोठ्यांनसारखे वागले असते तर काय अनर्थ ओढवला असता कल्पनाच करवत नाही. नानासाहेबांचे विचार सर्वांना विशेष करुन पुरुषांना पटले व त्यांनी यापुढे सोसायटीच्या कोणत्याही कार्यक्रमात कुणीही ड्रिंक करणार नाही व बाहेरुन ड्रिंक करुन आलेला कार्यक्रमात सहभागी होणार नाही असा ठराव पास केला.
आज एक वर्षी नतंर मकरंदला सर्व जसेच्या तसे आठवले आणि खरोखरच वर्षभर या नियमांचे पालन झाले होते. आज नवीन वर्षांच्या स्वागतासाठी सर्व सोसायटी उत्साहीत होती यावर्षी सर्व लहान मोठे एकत्रच सर्व सेलिब्रेशन करणार होते आज इतर डेकोरेशन सोबत रंगीत बलून ने सारी सोसायटी सजली होती कारण आज एका गोड परीचा वाढदिवस पण होता. मागच्या वर्षी च्या शिकवणुकीतून धडा घेवुन मकरंदने कायमच ड्रिंक घेणे बंद केले होते. सर्व सोसायटीला पुरेसा पडेल असा पाच किलो चा केक बोलावून नवीन वर्षाचा आनंद द्विगुणित केला होता. एक वर्षीच्या अमृता ला शुभेच्छा देत जुन्या वर्षाला निरोप देत …..
नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत झाले.

गुडबाय …2025😔
वेलकम… 2026

💃💃💕❤️💕💃💃

विनया देशमुख

error: Content is protected !!