समान ब्लॉग लेखन टास्क

inbound9205114903475228040.jpg

#माझ्यातलीमी
#समानब्लॉगलेखनटास्क
#कथा
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*पुन्हा नव्याने.*
(भाग १)
” या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या ,जाहल्या…. तिन्हीसांजा”…‌
रेडिओवर हे गाणं ऐकतांना प्रतिभाला खूपच रडायला येत होते.
वास्तविक अशा प्रकारच्या कित्येक कविता आपण आजपर्यंत लिहिल्याआहेत,हे तिच्या मनांत डोकावून गेले .पण आज आपली मनस्थिती रेडिओवरील गाण्यासारखी झाली आहे असे तिला वाटले.
हल्ली तिची मनस्थिती सारखीच बिघडत होती.कारण नसतांनाही मधूनच रडायला यायचे..अश्रुंच्या धारा सुरू व्हायच्या.नवरा सुधीरचे आकस्मिकपणे निधन झाल्यापासून तर मृत्यूचा धसकाच घेतला होता. रात्र रात्र झोप लागायची नाही. थोडीफार लागली तरी दचकून जाग यायची. त्यात आजकाल मासिक पाळीचा बराच त्रास होत होता.पाळी खूपच अनियमित झाली होती, रक्तस्त्रावही खूप व्हायचा.ती गायनाकाॅलाजिस्टकडे जावून आली .
डॉ .म्हणाल्या,”ही सगळी मेनोपाॅजची लक्षणें आहेत बरं कां! काळजी घ्यायला हवी. मिस्टरांचा मृत्यू अचानक झाल्याने नैराश्याचा त्रास जरा जास्तच होतो आहे तुम्हाला. मीऔषध लिहून दिली आहेच ,त्यासोबतच रोज सकाळी फिरायला जाणे,योगा, प्राणायाम, ध्यानधारणा नियमितपणे करीत जा. आता एकदम त्रास कमी होईल बघा.बऱ्याच स्त्रियांना अशातऱ्हेने मेनोपाॅजच्या त्रासाला सामोरे जावे लागते .”
प्रतिभाला मात्र कांहीही करण्याची इच्छाच होत नव्हती.तीकाळजीपूर्वक कांहींच करत नव्हती.त्यामुळे तब्येतीत सुधारणा होण्याचे कोणतेच लक्षण दिसत नव्हते .सारखी एकटेपणाची जाणीव व्हायची व कसलीतरी अनामिक भिती वाटायची.आजपर्यंत एकटं रहाण्याचा प्रसंग जो आला नव्हता तिच्यावर.
पार कोलमडून गेली होती ती!
.प्रतिभा व सुधीरराव उच्च मध्यमवर्गीय जोडपे .सुधीरराव एका मोठ्या नामवंत कंपनीत उच्च पदावर कार्यरत .कंपनीचा पाच रूम्सचा सुंदर फ्लॅट , चारचाकी गाडी. एकूण
आर्थिक स्थिती चांगली. सचिन हा त्यांचा एकुलता एक मुलगा. लहानपणापासून खूप हुशार ,
१० वी,१२वीला मेरीटमध्यें उत्तीर्ण. इंजिनिअर झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ( एम.एस.) अमेरिकेला जायचे त्याचे स्वप्न होते.सुधीरराव तर एकुलत्या एक मुलाला जावू नकोस असे म्हणणे शक्य नव्हते.
अत्यंत लाडका होता तो त्यांचा .
सचिनला ही आई व बाबा दोघांशिवाय अजिबात करमायचे नाही.पण शिक्षणासाठी सगळे कांही सहन करण्याची तयारी होती त्याची. प्रतिभाला त्याच्या तिकडे शिकायला जाण्याविषयी कांही प्राब्लेम नव्हता,पण एकदा मुलें परदेशात शिकायला गेली की पुन्हा इकडे वापस येत नाहीत.तिकडेच कायम रहातात व स्थायिक होतात हे
तिने बघितले होते, म्हणून तिची खास त्याला तिकडे पाठवायची इच्छा नव्हती.पण त्या दोघांपुढे तिचे काही चालले नाही.
सचिन म्हणायचा,”अग,आई आपण स्काईपवर रोज व्हिडिओ काॅल करत
जाऊ आणि पाहिजे तेवढा वेळ बोलत जाऊ.”शेवटी तो ठरल्याप्रमाणे अमेरिकेला गेलाच.
आता प्रतिभाला बराच मोकळा वेळ मिळायला लागला .सचिन येथे असतांना तिचा सगळा वेळ त्याच्या
काॅलेज व क्लासेसच्या वेळा पाळणे,खाणे-पिणें, नाश्ता ह्यातच जायचा. सचिनला आई सतत
नजरेसमोर लागायची.आता तिकडे गेल्यावर कसा करेल हे देवच जाणे,असा विचार नेहमी तिच्या मनांत उद्भभवत असे. पण सचिन मात्र तिकडच्या वातावरणाला लौकर सरसावला.त्याने मनाचा निग्रह जो केला होता! अशीच दोन वर्षे भराभरा निघून गेली.
तो अमेरिकेला गेल्यावर कविता लिहिणे पुन्हा जोमाने सुरू केले.खूप प्रसिद्धी मिळाली नसली तरी वर्तमानपत्रातून,मासिकांमधून ती मधून मधून कविता पाठवायची व त्या छापूनही यायच्या.सुधीरावांना व घरातील इतरांना तिच्या कविता लिहिण्याचे कौतुकच होते.
आता बऱ्यापैकी वेळ मिळत असल्याने तिने पुन्हा लिखाण सुरू केले .सचिन एम.एस. उत्तम रितीने पास झाला व त्याला तेथे एका
नावाजलेल्या कंपनीत जाॅबही मिळाला.सगळे कांहीं छान छान आनंदात चालू होते. दररोज व्हिडिओ काॅल करून मस्त गप्पा मारीत असत.बाबातर चेष्टेने “काय सचिन
आमच्यासाठी एखादीअमेरिकन सूनबाई बघीतली की नाही ?”म्हणून चिडवायचे सुद्धा. पण सगळे दिवस सारखे नसतात ना! प्रत्येकाच्या जीवनात आनंदा पाठोपाठ अचानकपणे मोठे दुःखही येतच असते. पण ते कधी सांगून येत नाही.ज्यांच्या जीवनात दुःख नाही अशी व्यक्ती पृथ्वीतलावर शोधूनही
सापडणार नाही.अचानक त्यांच्या आनंदाला ग्रहण लागले.
..प्रतिभाचे बालगंधर्व रंगमंदिरात चित्र काव्य संमेलन भरले होते. एका प्रतिथयश संस्थेचे आयोजक अनेक कवींच्या कविता मागवत आणि त्यांतील निवडक कविता मोठमोठ्या अक्षरांत लिहून त्याला अनुसरून एखादे सुंदर चित्र रेखाटत .अशी दिडशे दोनशे पोस्टर्स लटकवून त्याचे प्रदर्शनभरवित.गेल्या दोन तीन वर्षांपासून प्रतिभा ह्या काव्यप्रदर्शनांत भाग घेत होती.तिचे तीन दिवसीय काव्यप्रदर्शन सुरू होते,आज शेवटचा दिवस होता.तिच्या कविता खूप नावाजल्या गेल्या होत्या.त्यामुळे ती खूप खूष होती.संध्याकाळी कविसंमेलन होणार होते, त्यावेळी ती तिच्या कवितांचे वाचन करणार होती.
पण…..
अचानक तो वाईट काळ तिच्या आयुष्यांत चालून आला.एक तासापूर्वीच सुधीररावांचा तीला फोन येऊन गेला होता. आठ वाजेपर्यंत ते तिला घ्यायला येणार होते.इकडे प्रतिभाने तिच्या दोन कवितांचे वाचन केले.खूप टाळ्यांचा कडकडाट झाला.खूप सुंदर कविता सादरीकरण झाले,त्यामुळे.ती खूपच आनंदात होती आणि दुसरीकडे नियती तिच्याकडे बघून जणू हसत होती.प्रतिभाचा फोन वाजला.तीला वाटले नवऱ्याचा असेल पण बघते तर शेजारच्या काकांचा होता.त्यांनी जी बातमी सांगितली ती ऐकल्यावर तर प्रतिभाच्या पायाखालची जमीनच सरकली.सुधीरराव अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडले होते.घरांत एकटेच होते.कांहीतरी चौकशी करायला म्हणून काका त्यांच्या घरी गेले घरी असता अर्धवट दार उघडे होते व आत जाऊन बघतात तर सुधीर बेशुद्ध होऊन जमिनीवर पडलेले.हातातील मोबाईल जवळच बाजूला पडलेला होता.एका पायांत पायमोजा तसाच होता.बूट इकडे तिकडे फेकलेले होते.कदाचित त्यांना अस्वस्थ वाटले असावे व फोन लावण्याचा प्रयत्न करीत असतांना ते बेशुद्ध होऊन खाली पडले असावे.काकांनी लगेच बिल्डिंग मध्ये
असलेल्या डॉक्टरांना बोलावले.
त्यांनी तपासणी केल्यानंतर सुधीर ह्या जगांत नसल्याचे सांगितले.
त्यांच्या मते कार्डियक अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाला होता.काकांनी प्रतिभेला व इतरांना फोन केला. प्रतिभेला त्यांनी खरे कांहीं सांगितले नव्हते फक्त बेशुद्ध झाला आहे व डॉक्टर येताहेत एवढेच सांगितले.
वास्तविक सुधीररावांना कुठलाच आजार नव्हता.ठणठणीत तब्येत होती त्यांची.रोज सकाळी नियमित फिरणे, योग्य आहार, व्यायाम असे
व्यवस्थित चालू असायचे.
पण वेळ आली की कोणीही काहीही करू शकत नाही असे म्हणतात.
प्रतिभा घाईघाईने रिक्षा करून घरी जायला निघाली.रस्यांत नेमके रिक्षाचे टायर पंक्चर झाले.पुन्हा दुसरी रिक्षा चटकन मिळेना. अशावेळी अडचणी जास्त निर्माण होतात.घरी जाईपर्यंत तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते.
घरी गेल्यावर आजूबाजूला जमलेली गर्दी व सगळ्यांचे गंभीर चेहरे बघून तिच्या पोटात भितीने गोळाच उठला. घरांत गेल्यावर ते सगळे बघून तिला चक्करच आली.परिस्थितीची तिला कल्पना आली.सगळ्यांनाच फार मोठा मानसिक धक्का होता.
सचिनला फोन करून बोलावून घेतले होते.तिकडे त्यालासुद्धा धक्काच बसला होता ,पण सुट्टी काढून यायचे असल्याने खरे सांगणे भाग होते. मित्रांच्या मदतीने विमानाचे तिकीट काढून तो येण्यास निघाला.पण दोन दिवस जाणारच होते, त्यामुळे सुधीररावांची बाॅडी हाॅस्पिटलमध्यें बर्फात ठेवण्यात आली.प्रतिभाला तर सचिन येईपर्यंत झोपेच्या गोळ्या देऊन झोपवून ठेवले होते.सचिन भारतात घरी आल्यावर पुढील सगळे सोपस्कार झाले.त्याला कशीबशी एक महिन्याची रजा मिळाली होती.पंधरा दिवसांनंतर बॅंकेचे व्यवहार ,इतर महत्वाची कामे जितके जास्तीत जास्त निपटवता येतील ते त्याने पार पाडले.एवढी मोठी जबाबदारी इतक्या लहान वयात त्याच्यावर येऊन पडली होती.आणि….
पुन्हा ती सचिनची अमेरिकेला वापस जाण्याची वेळ आली.आता मात्र प्रतिभेला हृदयावर दगड ठेवण्याची वेळ आली होती.
“भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ठरले होते”.तीने जड अंतःकरणाने सचिनच्या भविष्याचा , त्याच्या करिअरचा विचार करून त्याला परवानगी दिली होती. तो वापस गेला आणि प्रतिभा पुन्हा खूप एकटी पडली.तिचे रोज सचिनशी बोलणे व्हायचे पण दोघेही दु:खी, बोलायला कामाव्यतिरिक्त दुसरे विषय सुचायचे नाही.सचिन आईला जास्तीत जास्त आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा.शेवटी काळच हा प्रत्येक दु:खावर औषध आहे असे म्हणतात. ह्या गोष्टीला जवळपास वर्ष होत आले होते. मध्यंतरी थोडी सावरल्यासारखी होते न होते म्हणेपर्यंत पुन्हा मेनोपाॅजमुळें नैराश्य, भिती वगैरे त्रास सुरु झाले होते. अशा सर्व विचारात ती गुंग असतांना मोबाईलची रिंगटोन ऐकू आली….
© ®(लेखिका–रोहिणी अग्निहोत्री)
(भाग२)
विद्या, तिची बालमैत्रिण फोनवर बोलत होती.”अगं, राज्यव्यापी काव्यस्पर्धा आहेत,तुला न विचारताच मी तुझे नांव दिले बघ!”उद्या मी येतेय.”
दुसऱ्या दिवशी….
डोअर बेल वाजविणाऱ्या विद्याला सखीचे शब्द ऐकू येतात‌‌…..
“जायचे रे मानवा तुला एके दिनी,
बंध सर्व हे झुगारूनी!
सरतील हे दिन जरी,
उरतील सगळ्या आठवणीं!
अंतीम ह्या वाटेवरती,
कुणी न असती साथ-संगती!
असेल कां वाट काट्यांची,
की मखमली पायघड्यांची?
अंतसमय येता जीवनी
करू न शकती कांही कुणी!
जायचे रे तुला अनवाणी!
जन्मता रडसी तूं एकटा,
जातांना नससी तूं दुकटा!
तुझे वाडे नि घरदारें,
राहती येथेच सारे!
साथीला ना सगेसोयरे,
एकल्यानेच तुला जायचे रे!
एकल्यानेच तुला जायचे रे!”
©(कवयित्री –रोहिणी अग्निहोत्री)
विद्येला प्रतिभेची ढासळलेली मनस्थिती लक्षांत आली होती.
“नाही, कविता उत्तमच आहे मात्र उदास मूड जाणवतोय”…. ‘स्पर्धेत.’…..
“मला विचारशील तर जरा नंतर बघू.मला सांग काय अवतार करून घेतला आहेस आता? सुधीररावांना तरी तूं अशी हताश झालेली आवडले असते कां?”
“अग,काय सांगू तुला, सचिनला कंपनीने तिकडच्या तिकडे वर्षभरासाठी कॅनडाला पाठविले आहे.आता रजेवर येण्याचे चान्सेस आणखी कमी झाले .मला तर त्याला केव्हा भेटीन असे झाले आहे बघ”.प्रतिभाने तिच्या मनांतील खदखद बोलून दाखविली.
“मग बिघडले कुठे?”,विद्या म्हणाली.
“अग, आजकाल सगळीकडे हेच चाललंय!”
“मुलांना चांगली नोकरी मिळावी, मोठ्या शहरांमध्ये किंवा परदेशात जाण्यासाठी संधी मिळावी यासाठी तुम्ही खस्ता खाता.मग मुलांना संधी मिळाली तर त्यांचे येणे अवघड होऊन बसते, असे एकटेपणाचे गाऱ्हाणे गाण्यांत काय अर्थ आहे?”
“म्हणजे,मी काय जगावेगळी वागले कां?”प्रतिभेला खमेवर मीठ चोळल्याचे दु:ख झाले.
“आणि, ‘हे ‘ होते तोपर्यंत जाणवले नाही.एकमेकांच्या आधाराने रहात होतो.मात्र कार्डियक अटॅकने ते गेले आणि माझ्या जगण्याला अर्थ उरला नाही! “प्रतिभेला आज उमाळे येतच होते.
“पोटभर रड”.कारण यानंतर तुझ्या अश्रुंचा कोठा संपवायला मी आले आहे.,”विद्या.
“म्हणजे?” प्रतिभा.
हे बघ प्रतिभे,”अशा परिस्थितीत सापडलेली तूं कांहीं एकटीच बिचारी नाही आहेस. माझ्या धाकट्या जाऊबाईंचे सांगते, त्यांच्या प्रणवला परदेशांत जायची संधी आली.पैशाची
जुळणी करण्यासाठी शेती विकली. आता तो तिकडेच स्थायिक होणार म्हणून दिर -जाऊ गेले मागच्या वर्षी, कायमस्वरुपी!.पण काय झाले?
पहिल्या सहा महिन्यांतच कंटाळले.
तुला सांगू कां? अगं, वयाच्या साठीनंतर कुठे उचलबांगडी करायची स्वतःची? आपला फिरायला जाण्याचा,भिशीचा ग्रुप ,इतर सगळा परिवार इथेच सोडून गेलेलो असतो.
शिवाय ह्या वयांत तिकडचे हवामान जडच जाते.परत आली जोडीआणि शेजारच्या मळ्याकडे बघून उदास होतात अन् काय?”
“मग काय”? आपण मुलांना उच्च शिक्षण द्यायचेच नाही?पंखांत बळ द्यायचेच नाही?त्यांना चांगली संधी मिळाली तर नाकारायची?” प्रतिभेचा वैताग बाहेर पडला.
“अगं हो,हो,” विद्या म्हणाली.
सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.किर्ती तांडेल यांनी या प्रश्नावर छान विवेचन केले आहे.”मुलं जेव्हा नोकरीसाठी शहरात वा परदेशी जातात,त्याच दरम्यान आई नोकरी करत असेल तर निवृत्तीची वेळ येते.
रजोनिवृत्तीपण अलिकडे-पलिकडे आलेली असते.पुरुषवर्ग नोकरीतून
निवृत्त झाला तरी मित्रांसोबत क्लब किंवा तत्सम गोष्टींत रमतो.आईचे तसे नसते. घराशी पूर्णवेळ बांधली गेलेली “ती”,आता आपण अडगळ आहोत.आपली गरज संपली.आपण कुणाला नको आहोत ,अशी उदासीनता निर्माण होते.”
“एम्टी नेस्ट सिंड्रोम “, म्हणतात याला.
ज्या घरासाठी रात्रंदिवस राबलो तेच
घर मोकळे झाले…….
भिंती अंगावर येतात, म्हणून हळवी होते.
“आणि आपल्या भारतात बहुतेक शहरांत ही स्थिती आहे.
“मुलं पैसे देतात ,
पण वेळ देत नाहीत.” अशी खंत असते.
आणि तुझ्या प्रमाणेच कधीतरी जोडीदारापैकी एकजण परतीच्या प्रवासाला निघून जातो आणि पेचप्रसंग निर्माण होतो.
“हे असे आहे तर!” उसासा टाकून
प्रतिभा म्हणाली.,”असंच कुढत ,रडत जगायचं आणि एक दिवस संपूनच जायचं.”……
“अं,हं!”
विद्या म्हणाली,” डॉ.तांडेल ह्यांनी कांही गोष्टी सुचविल्यात.एकटेपणाचा त्रास झाल्यास मित्रमंडळ,जवळचे
नातेवाईक यांच्याशी बोलावे.गरज पडली तर मानसोपचारतज्ञांची मदत घ्यावी.आपले आतापर्यंत बाजूला ठेवलेले छंद,आवडी पुन्हा नव्याने जोपासावे.आपले रोजचे वेळापत्रक कायम ठेवावे.व्यायाम व आहार यातही योग्य बदल करावेत.”
“मुलांशी सतत संपर्कात रहावे.”
“आपली मुलं किती दूर आहेत यापेक्षा मनांतील अंतर कमी ठेवावे.बदलत्या वेगवान जीवनशैली तुम्हांला अंगिकारता येणार नाहीत.पण प्रवाही होऊन स्विकार करा.सगळे सोपे होते!”
“अगंबाई, आज विद्येच्या जीभेवर
सरस्वतीच प्रकट झाली जणूं!”
“ए बाई, सगळं एकदम डायजेस्ट होणार नाही.पण नक्कीच विचार करेल व तो अंमलातही आणेन.” प्रतिभेचा मूड ठीक होत होता.
यावेळी काव्य स्पर्धेत विशेष गाजलेली कविता होती…….. ‌. “भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ”
ओवाळीन नेत्रज्योतींनी तुम्हां सर्वांच्या आठवणीं,!
सांगते एकदा तरी आयुष्यांत प्रत्येक स्त्री केविलवाणी!
बंदिस्त झालीय सगळ्या जगाकडून ती!
ओळखलंत? आई असणारी प्रत्येक स्त्री आहे ती!
जीवनतील मधला टप्पा जगत नाही ती स्वतः साठी,
तिचा संसार,तिची मुलें हेच जग उरते तिच्यासाठी!
अडकते मात्र पुढे तिनेच विणलेल्या तिच्या नात्यांत,
पिलें, मोठी होऊन घेतील मला लहान मुलासारखे कुशी!
अपेक्षा असते तिची ही छोटीशीच खाशी.!
मोठ्या झालेल्या पिलांनाही, असतो त्यांचा संसार!
हवेत भरारी घेण्याचीही असते
त्यांना घाई!
शेवटी तिच त्यांना प्रोत्साहन देते!
पिलांनो,
उडून घ्या भरारी नव्या जगात !
संवय करेन मी एकटेपणाची या
आसमंतात.!
आस लावून डोळ्यांची निरंजन,
तेवत ठेवेन तुमच्यासाठी!
ओवाळीन नेत्रज्योतींनी तुम्हां सर्वांच्या आठवणीं!
ओवाळीन नेत्रज्योतींनी तुम्हां सर्वांच्या आठवणीं!
©(कवयित्री –रोहिणी अग्निहोत्री)
स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या
ह्या कवितेमुळे प्रतिभाची सारी उदासी,सारी मरगळ नाहिशी झाली.
व्हिडिओकाॅलवर सचिनला ट्राॅफी दाखवतांना त्यानी विद्यामावशीला श्रेय दिले.
…इतर सर्व भूमिका पार पाडतांना स्वत:त डोकावून बघायचे राहून गेले होते.आज” माझ्यातल्या मी’ चा” “पुन्हा नव्याने” शोध लागला होता.
चला………
“पुन्हा नव्याने “!
यशस्वी कवयित्री म्हणून मिरवशील.
“हो, आता पुन्हा नवनव्या कविता सुचत आहेत बघ!”प्रतिभा उत्साहित होऊन म्हणाली.
“लवकरच आपण आपल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन करू “असे तिने विद्याला आश्वासन दिले.
आपल्या मैत्रिणीच्या या नव्या रुपाकडे पाहून विद्या आनंदाने गुणगुणु लागली,
“झटकून टाक जीवा,
दुभळेपणा मनाचा–!”
©® (लेखिका–हेमलता शेटे)
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

.

656 Comments

  1. Нужен трафик и лиды? https://avigroup.pro/kazan/kontekstnaya-reklama/ SEO-оптимизация, продвижение сайтов и реклама в Яндекс Директ: приводим целевой трафик и заявки. Аудит, семантика, контент, техническое SEO, настройка и ведение рекламы. Работаем на результат — рост лидов, продаж и позиций.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!