कॉलेज संपले आणि स्टेशनवर मुलं आपआपल्या घरी जायला निघाली होती.
आयुष्यात पुन्हा भेट होईल की नाही या विचारात तिची नजर त्याला शोधत होती पण तो दिसला नाही .तिची ट्रेन निघाली मन आणि आभाळ दाटून आले होते . पाऊस सुरू झाला, गाडीने फलाट सोडला आणि वेग धरला .खिडकीतून समोर विरुद्ध दिशेला जाणाऱ्या गाडीच्या
दारात उभा तो हातात तीचा रुमाल फडकवताना दिसला.तिने हळूच पर्स मधून त्याचा रुमाल काढून डोळे टिपले. समांतर रुळांवर ट्रेन आणि दोन जीव मार्गस्थ झाले.

खुप छान