माझ्यातलीमी
#अलकलेखन ( १७/९/२५)
*दिलेले वाक्य*
“मी तुझ्या बाजूने कधी विचार केलाच नाही “.
*** समर्पण ***
दुर्गम वस्तीतील मुलांच्या पुनर्वसनाच्या
कामासाठी त्या दोघांनी आयुष्य वाहून घेतले होते.आज पुरस्कार घेताना त्याला
सतत तिचीच आठवण येत होती.घरी येऊन त्याने आज प्रथमच तीचे कपाट उघडले.समोरच खणात तीला लग्नाआधी सर्वोत्कृष्ट नर्तिका म्हणून मिळालेली नटराजाची प्रतिमा,त्या समोरील तीचे घुंगरू आणि त्याला वाहलेली कोमेजलेली फुले दिसली. आजचे सन्मानचिन्ह तिच्या फोटोसमोर ठेवून तो म्हणाला “मला क्षमा कर मी तुझ्या बाजूने कधी विचार केलाच नाही माझ्या ध्यासापायी तुझी कला ही कोमेजून गेली”.
©® जयश्री दिक्षित

वा, सुरेख
खुप छान