#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा
सकारात्मक दृष्टी
गौरवला मॉडर्न बायको हवी होती .बाबांनी गावच्या कीर्ती बरोबर जबरदस्तीने सुसंस्कारित अशा त्यांच्या मित्राच्या मुलीशी त्याचं लग्न लावलं.गौरव नाराज होता. सत्यनारायण झाल्यावर ऑफिसच्या कामासाठी टूरवर निघून गेला.
“बाबा हॉस्पिटल मधे आहेत, हार्ट अटॅक आला” कीर्तीच्या फोनने तो डायरेक्ट हॉस्पिटल मधे गेला .कीर्तीने वेळेत स्वतः कार ड्राइव्ह करत ऍडमिट केलं, ज्या पद्धतीने ती डॉक्टर, नर्सेसशी बोलून सगळं सांभाळत होती ते बघून गौरव आश्चर्यचकित झाला.त्याच्या डोळ्यात तिच्या बद्दलचं कौतुक पाहून बाबा म्हणाले ,*तू घराचा गौरव आहेस,तिला पुढे जायची संधी दे, ती घराची कीर्ती वाढवेल* .तेव्हा गौरवला जाणवलं की *बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते* .
सौ स्वाती येवले
शब्द १००

