रात्री एवढ्या उशीरा पल्लवीकाकू कशा काय म्हणतच दार उघडलं, तर तरातरा स्वयंपाकघरात शिरत म्हणाल्या, “सुधा, प्रणीता गेली.”
“काय? कशी? कधी? “ सुधाची आणि गौरीची एकच प्रतिक्रिया.
प्रणीता गौरीची मैत्रीण. इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला होती. नाताळच्या सुट्टीत काका-काकू, चुलत बहीण यांच्याबरोबर बंगलोरला गेली होती. पहाटे रस्त्यावर खूप धुकं असल्यामुळे वळणावरनं जाताना ड्रायव्हरला समोरून येणारा ट्रक दिसला नाही, आणि झालेल्या अपघातात प्रणीता जागीच दगावली.
गौरीच्या डोळ्यांत पाणी तरळलं. म्हणाली, “ आजोबा गेल्याचं कळलं म्हणून पुण्याहून आल्याबरोबर संध्याकाळीच मला भेटायला आली होती. बंगलोरला जाऊन आल्यावर वेळ नाही मिळणार म्हणाली. ”आता काही आपण परत भेटणार नाही.” हे तिचे निरोपाचे शेवटचे शब्द अशा रीतीने खरे व्हावेत? नियतीचा संकेत होता का तो?”
(शब्दसंख्या – १०४)
-©️®️अनुपमा मांडके
०१/०९/२०२५

छान