शेजारी बाई आणि खिडकी

“शेजारी बाई आणि खिडकी”

स्वरा दररोज ऑफिसला जाताना ओढणी डोक्यावर घेत असे.
शेजारची बाई, खिडकीतून टिपण करत असे –
“सांगितलं का घरात? एवढं बाहेर जातंय! सासरच्या मर्जीविरुद्ध चाललंय वाटतं.”

सुरुवातीला स्वरा चिडली, रडली, नवऱ्याला सांगितलं.
पण तो शांत म्हणाला –
“खिडक्या बंद होतात, पण तुझं मन बंद करू नकोस.”

त्या दिवसापासून स्वरानं ती खिडकी पाहणं बंद केलं.
नवऱ्याच्या पाठिंब्यानं शिक्षण पूर्ण केलं.
आता ती शिक्षक आहे –
अन्य घरांमध्ये आत्मविश्वासाची खिडकी उघडणारी.

कारण…
दुर्लक्ष करणं शिकली,
तेव्हाच स्वतःसाठी जगायला लागली.
आणि मिळालं – खरंखुरं सुख
.83शब्द

तृप्ती देव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!