शून्य किंमत ..

#माझ्यातली मी
#लघुकथा

…. त्या लोकांना तुमचा मोल कधीच समजणार नाही
ज्या लोकांसाठी तुम्ही नेहमीच हजर असता …

संध्याकाळच्या वेळेला वर्षा प्राजक्ता कडे गप्पा मारण्यासाठी आली होती , तेही खूप दिवसांनी…. गप्पा खूप छान रंगल्या होत्या . पण वर्षाचं लक्ष नुसतं घड्याळाच्या काठ्याकडेच होतं.
शेवटी न राहून प्राजक्ताने विचारलं की , “तू सारखं सारखं घड्याळाकडे का लक्ष देते आहेस “? त्यावर वर्षा म्हणाली की ,” अग राहुल घरी यायची वेळ झाली आहे. त्यामुळे मला वेळेत घरी गेले पाहिजे , अग तो पाणी सुद्धा आपल्या हाताने घेऊन पीत नाही , प्रत्येक गोष्ट हातात द्यावी लागते , 24 तासमला त्याच्या सेवेसाठी मला उभं राहावं लागतं ,”….. त्यावर प्राजक्ता म्हणाली की ,”मग तुझ्या पतीच्या मनात तुझ्याबद्दल खूप किंमत आणि आदर असेल ना ! ..”
वर्षा म्हणाली,”शून्य किंमत आहे , कामवाली बाई काम संपवून घरी जाते आणि मी मात्र इथेच राहते एवढाच फरक आहे बघ “.
या वाक्यावर प्राजक्ताला वर्षाची कीव आली..तिने मग वर्षाला एक युक्ती सुचवली….
………..प्राजक्ताच्या म्हणण्यानुसार वर्षा सलग चार दिवस आजाराच सोंग घेऊन झोपून राहिली …..
आणि मग काय ..या च्यार दिवसात जे जे आठवायचं होत ते ते सारं राहुलला आठवलं … अतिशय नम्रपणे आणि मनापासून त्याने वर्षाची माफी मागितली …

रूपाली मठपती ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!