शीर्षक -​शांततेचं ओझं

inbound173154257640001908.jpg

#माझ्यातली मी
#लघुकथालेखन टास्क
@everyone
🌹 शीर्षक -​शांततेचं ओझं 🌹

रमेश आणि सुजाताच्या नात्यात दहा वर्षांपासून न बोललेल्या शब्दांची भिंत उभी होती. रमेश शांत स्वभावाचा होता, आणि सुजाताचे सगळे शब्द त्याच्या शांततेत दडून जायचे. तिला प्रत्येक वेळी तो भावनाशून्य वाटायचा.
              आज त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस सुजाताला अपेक्षा होती की रमेश भावनिक बोलेल. आज तरी तो आपल्या भावना व्यक्त करेल पण त्याने भेटवस्तू दिली, पण ‘हॅपी ॲनिव्हर्सरी’ पलीकडे काहीच बोलला नाही. तिच्यासाठी तो दिवस अपूर्ण राहिला.
          जेव्हा ती तिच्या मैत्रिणींना त्यांच्या नवऱ्यासोबत गप्पा मारताना, हसताना किंवा त्यांनी केलेलं कौतुक ऐकताना पाहायची, तेव्हा तिच्या मनात विचारांचं काहूर माजायचं. ‘माझ्या नशिबातच असं कोरडं प्रेम आहे का?’ असा प्रश्न तिला पडायचा.”
          ​एकदा सुजाताला ऑफिसमध्ये मोठी बढती मिळाली. तिने आनंदाने ही बातमी रमेशला सांगितली, पण त्याने फक्त मान हलवली आणि वर्तमानपत्र वाचत बसला ‘अभिनंदन’चा एकही शब्द त्याने उच्चारला नाही. सुजाताच्या आनंदावर विरजण पडलं.तिला प्रत्येक वेळी तो भावनाशून्य वाटायचा.
            तिला ​सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा सुजाताच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. हॉस्पिटलमध्ये काळजीने व्याकूळ असलेल्या सुजाताला त्याने एकही दिलासा देणारा शब्द बोलला नाही. तिची भावनिक गरज त्याने पूर्ण केली नाही.
               ​गावाहून परतल्यावर त्यांच्यात शांततेचं जड ओझं निर्माण झालं. एका रात्री रमेशला झोप लागलेली असताना सुजाता रडली. तिला वाटलं, त्याला माझ्या भावनांची किंमत नाही.
​तिच्या रडण्याने रमेश जागा झाला आणि म्हणाला, “मला माफ कर. मला कळत होतं की, तुला त्या दिवशी माझ्या आधाराची किती गरज होती. माझ्या मनात खूप प्रेम आहे, पण मला ते व्यक्त करता येत नाही.”
               ​रमेशचे हे शब्द ऐकून दहा वर्षांचं ओझं हलकं झालं. तिने त्याला मिठी मारली. त्यांना जाणवलं, शब्दांना व्यक्त होऊ द्यायला हवं, नाहीतर ते ओझं बनून नात्याला दुबळं करतात.
नात्यांत प्रेम टिकवण्यासाठी भावना व्यक्त करणं अत्यावश्यक आहे.कारण, न बोललेले शब्द नेहमीच ‘शांततेचं ओझं’ बनून नात्याला कमजोर करतात!
शब्द संख्या 265 ~अलका शिंदे

One comment

  1. Bet288 is just alright. It’s nothing special but you can definitely find some fun things to do on the site if you’re bored. Check it out for yourself: bet288!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!