#माझ्यातली मी
#शतशब्दकथा (२८/७/२५)
-शिवशक्ती-
तिनं हजारो वर्षं तप केलं.
त्याचं मौन, तिचं धैर्य.
शेवटी डोळे उघडत तो म्हणाला “का मी?”
ती हसली, “कारण तू शून्य आहेस आणि शून्यातूनच विश्व जन्मतं.”
शिव म्हणाला, “मी संन्यासी, संसार कसा?”
पार्वती शांतपणे उत्तरली “मी तुझ्या तपातली श्रद्धा होईन.”
तेव्हा त्यानं तिचा हात धरला.
शिव–पार्वतीचं नातं त्या क्षणी निर्माण झालं नव्हतं, ते त्या क्षणी ओळखलं गेलं.
शिवशक्ती म्हणजे परस्परांतील पूर्णत्व.
ती त्याची शक्ती झाली.
तो तिचं स्थैर्य.
ते दोघं एकमेकांत हरवले आणि विश्वाला एकत्र मिळाले.
शिवशक्ती म्हणजे समर्पणाची पूर्णता.
ती मागे वळून पाहत नाही.
कारण तिचा रस्ता आता वेगळा नाही.
शिवाचं मौन आणि तिचं प्रेम जे उपासनेइतकं पवित्र आणि स्वतःइतकं निर्मळ.
शब्दसंख्या (१०३)
