# माझ्यातली मी
# शत शब्द कथा
विषय….आऊटसोर्सिंग आणि स्वातंत्र्य दिन
शिकवण
,, , ते चार बालमित्र गेल्या वर्षीच एम. बि बि.एस. होऊन एका मोठ्या रुग्णालयात नौकरीला होते. या वर्षी … विचार केला .. थोड आऊटिंग करु … . 100 किमी असलेल्या एका सहलीच्या ठिकाणी जायचा बेत ठरला.पाऊस धुवाधांर कोसळत होता… .
… तरुणवय … . गाडीने गाणी ते निघाले. सहलीच्या ठिकाणाच्या अलिकडे एक नदी होती बाजूला एका गावाची वस्ती . पोहचताच दृश्य दिसल….नदीला मोठठा पूर आला होता … . गावात थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. सभ्य मुल पाहून गावच्या सरपंचाने त्यांना घरी नेले. भोजन, आरामाची व्यवस्था केली असे अगत्य पाहून ते भारावून गेले ..गाढ झोपी गेले.
पहाटे काही आवाजाने त्यांना जाग आली. .. जाऊन पाहताच सारे कुटुंब चितेंत दिसले. सरपंचाच्या सुनबाईला पंधरा दिवस अगोदर बाळंतपणाच्या कळा सुरु झाल्या होत्या. गावातून बाहेर पडायचा मार्ग देखील बंद झाला होता. .
सर्व परिस्थिती देखता त्यांना … आपल्या कर्तव्याची जाणीव झाली कुटूंबाला धिर देत सांगितले …आम्ही चौघ डॉ. आहोत …ताईंची मदत नक्की करु.
वरिष्ठ डॉ नां फोन करुन सर्व माहिती दिली . डॉ. मॅडम नी व्हिडिओ वरुन दिलेल्या सुचनेनुसार काम करत त्यांनी ते अवघड काम सोपे केले..सरपंचाना दोन गोड नाती मिळाल्या …अन त्या चौघांना तिन जीव वाचवल्याचे समाधान.
रुग्णसेवा हेच डॉ. चे प्रथम कर्तव्य हि शिकवण मनात रुजवत ते आऊटिंगला न जाता कर्तव्यावर परतले.
विनया देशमुख
शब्द संख्या ….152
