# शताब्दी कथा

शतशब्द कथा (१/९/२५) 

निरोप……  दु:खाला….

जयूला माहीत होते की, आपल्याला ब्लड कॅन्सर आहे व तोही शेवटच्या टप्प्यात आहे. माणूस आहे, वाईट तर वाटलेच तिला. पण…..  आहे ते स्वीकारायचे तेही हसत खेळत हे तिने स्वतःच्या मनाला समजावले.  जन्माला आलेला  प्रत्येक जण जाणारच आहे. असा विचार करून तिने दुख:ला, निराशेला वाईट विचारांना कायमचा निरोप दिला. 

ती नोकरी निमित्त बंगलोरला होती.  नुकतेच लग्न ठरले होते. आपल्या आजारा बाबत घरात सांगायचे होते पण कसे?  ते तिला कळत नव्हते.  तिने जेवढ्या सहजतेने हे स्विकारले तेवढे नातेवाईक स्विकारतील का?  आपल्या भावी नवर्याला समाजवून लग्न रद्द करायचे होते. आजारा पेक्षा या गोष्टीचा तिला जास्त त्रास होत होता. 

जयू रजा घेऊन घरी आली.  घरातले, सुबोध (नवरा)  व सासरच्या सगळ्यांना खूप आनंद झाला. सगळे असताना, तिने सर्वांना आपल्या आजारा बद्दल सांगितले. ऐकून सगळेच अवाक् झाले, आईला चक्करच आली, सगळे यातून सावरल्यावर, तिने सुबोधला विनंती केली की,  प्लिज, आपण इथेच थांबूया.  इथून आपले रस्ते वेगळे आहेत. मला या आजारात तूमच्या सर्वांची साथ हवी आहे. माझ्या प्रमाणे तुम्ही पण हे सत्य स्विकारा. मी तुम्हांला उदास, दु:खी  बघू शकत नाही. जेवढे दिवस आहेत ते मला आनंदाने जगायचे आहे. सर्वांना वाईट वाटले तरी तिच्या समाधानासाठी सगळ्यांनी मान्य केले. 

जयूने डॉक्टरांना सांगितले की, मी मेल्यावर, माझ्या ज्या अवयवांचा उपयोग होणार असेल ते मला दान करायचे आहे. त्याप्रमाणे तिने फाॅर्म भरून दिला

शब्द संख्या : २०५

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!