#शताब्दकथा

इतकी वर्ष वारी केली पण यावर्षी पांडुरंगा पर्यंत कसे पोहचायचे सदाशिव विचार करत होता, ‘तब्बेत बरी न्हाय, कुठं जायचं न्हाय’. मुलाने बजावलं होतं पण सदाचे डोळे वारीच्या वाटेकडे लागलेले , सदा उठला डॉक्टरांकडे गेला म्हणाला ‘ डाक्टर काय बी करा माझा ताप उतरवा, मला वारीला जायचंय माझा पांडुरंग वाट बघतुया’.
औषधाने सदाचा ताप उतरला सदा वारीला निघाला. राम कृष्ण हरी , वासुदेव हरी करत दिंडी पंढरपूरकडे निघाली. सदाला मधूनच कणकण वाटत होती पण टाळ मृदुंगाचा नाद आणि पांडुरंगाची ओढ त्याला थांबू देईना. सगळे म्हणाले ,बाबा तब्बेत बरी न्हाय जा माघारी पण सदाने निश्चय केला आता मागे फिरायच नाय. ऊन,वारा,पाऊस सगळं सोसलं, अखेर वारी पंढरपुरात पोहचली, दुसऱ्यादिवशी काकड आरतीला सदाने पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं अन् पांडुरंगाच्या चरणी सदाच्या जीवनाची वारी संपली. 🙏🏻🙏🏻

ही सत्यघटना आहे माझे चुलत सारे तीन वर्षापूर्वी वारीला गेलेले तिथेच ते वारले. त्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली म्हणून आजची कथा लिहिली आहे.🙏🏻🙏🏻

कल्पना देवकर

19 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!